• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

चाईल्ड अँक्टिव्हिटी अंतर्गत चित्रकला व निबंधस्पर्धेत साळवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य बक्षिसे…

Mar 2, 2023

Loading

चाईल्ड अँक्टिव्हिटी अंतर्गत चित्रकला व निबंधस्पर्धेत साळवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य बक्षिसे…

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – सेवा संस्था अहमदाबाद, प्रायमार्क आणि शाश्वत कापूस कार्यक्रम ( PSCP) यांच्या अंतर्गत साळवे इंग्रजी विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसे देण्यात आले. निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रणाली नारखेडे, व्दितीय गायत्री बोरोले, त्रुतिय रेहान पटेल आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक हेतल नेहेते व्दितीय लक्ष्मी बोरोले, त्रुतिय भावना कोळी या विजयी स्पर्धकांना स्कूलबँग,पँड, टिपीन,कंपास, रंगपेटी व चित्रकला वही बक्षिसे देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व बक्षिसे देण्यात आले. यावेळी ग्रामसुधारणा मंडळाचे खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन चित्रकला शिक्षक एस पी तायडेसर यांनी केले. परिक्षण एस डी मोरेसर यांनी केले. चाईल्ड एँक्टिव्हिटी अंतर्गत स्पर्धेचे आयोजन क्रुषिसखी सीमा नेहेते व लीना कोल्हे यांनी केले. प्रास्ताविक अँग्रोनामिस्ट,डोकमेंटशन आँफिसर आशिष शहारे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केले, कौतुक करून शुभेच्छा दिल्या व अतिथितींचे आभार मानले.यावेळी सौ नीता पाटील, सौ गुणवंती पाटील व सौ प्रतिभा पाटीलमँडम उपस्थित होत्या. एस पी तायडे सरांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *