• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमनी गाडीचे उद्घाटन थाटात संपन्न

Mar 2, 2023

Loading

गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमनी गाडीचे उद्घाटन थाटात संपन्न

उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे नुकताच 14 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटात मुक्ताईनगर येथील संत शिरोमणी सावता माळी समाज मंदिर येथे संपन्न झाला याप्रसंगी फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते फाउंडेशनला दानशूर व्यक्तिमत्व श्री तुळशीराम सदाशिव वावगे यांनी एक लाख पंचवीस हजाराची देणगी दिली होती त्यामधून फाउंडेशनने त्यांच्या पत्नीच्या नावे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावगाव फिरते वाचनालयासाठी एक ओमिनी गाडी खरेदी केली त्या ओमनीचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका तथा फाउंडेशनच्या राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रतिमा इंगोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी श्री तुळशीराम वावगे यांचे आभार व्यक्त केले व ही ओमनी दर सुटीच्या दिवशी तालुक्यामध्ये गाव गाव फिरते वाचनालय म्हणून प्रारंभ होईल या फिरत्या वाचनालयामध्ये साहित्यासह, एमपीएससी, यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके सुद्धा उपलब्ध असणार आहेत असे ते प्रसंगी म्हणाले याप्रसंगी अनेक मान्यवरांनी उज्जैनकर सर यांना पुस्तक भेट दिलीत याप्रसंगी श्री असे एस. ए. भोई सर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिनेशभाऊ पाटील भाजपाचे तालुका सरचिटणीस विनोदभाऊ पाटील पंचायत समिती सदस्य राजूभाऊ सवळे फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष डॉ. सतीश तराळ, अमरावती राज्य सचिव प्रा. डॉ.सुभाष बागल, औरंगाबाद राज्य प्रसिद्धी प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत, बुलढाणा महिला राज्य संपर्कप्रमुख ह. भ. प. राधाताई पाटील, पारोळा राज्य संघटक आनंद महाजन, अमरावती जळगाव जिल्हा दक्षता समितीचे संपर्कप्रमुख राजेश पोतदार महिला संपर्कप्रमुख ज्योतीताई राणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील जिल्हा सचिव गणेश कोळी बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे समन्वयक पांडुरंग दैवज्ञ संपर्कप्रमुख प्राचार्य पंढरीनाथ शेळके जिल्हा उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष शाहीर मनोहर पवार जिल्हा सचिव शंकरराव आणि जिल्हा संघटक कवी रामदास कोरडे डॉ. निवृत्तीभाऊ जाधव महिला उपाध्यक्ष सोनालीने वैराळ
ठाणे जिल्हा समन्वयक रमेश भाऊ उज्जैनकर औरंगाबाद जिल्हा संपर्कप्रमुख साळवे धाराशिव जिल्हा समन्वयक कवी मधुकर हुजरे अकोला जिल्हा समन्वयक डॉ.अशोक शिरसाट याप्रसंगी फाउंडेशनचे सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर ज्येष्ठ सदस्य ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर सुनील मुंधुकार जयवंत बोदडे सौ. जयश्री नितीन
भोंबे, शिवशंकर गोरले, राजेंद्र भाऊ सवळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव गाव फिरते वाचनालय या उपक्रमासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेल सूत्रसंचालन जळगाव जिल्हा दक्षता समितीचे संपर्कप्रमुख ज्योतीताई राणे व सचिव गणेश कोळी यांनी केले तर आभार फाउंडेशनचे सदस्य पत्रकार प्रा. विनायक वाडेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *