• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भडणे येथे रामलीला कथेतून हिंदू ,,,मुस्लिम बांधवांनी जोपासला जातीय सलोखा,
रामलीला कार्यक्रमात मिळाला आरतीचा मान मुस्लिम दाम्पत्याला

Mar 25, 2023

Loading

भडणे येथे रामलीला कथेतून हिंदू ,,,मुस्लिम बांधवांनी जोपासला जातीय सलोखा,,,
रामलीला कार्यक्रमात मिळाला आरतीचा मान मुस्लिम दाम्पत्याला,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव तालुक्यात जसे राजकारण अग्रेसर आहे त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रात तालुक्यात अग्रेसर आहे सुमारे साडेचार हजार लोक वस्ती गावात 18 जाती जमातीचे लोक गुन्या गोविंदाने राहतात गावात वर्षातून दरवर्षी चार ते पाच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात येते यावर्षी उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या नगरीतील दहा कलाकार राम लीला कथेच्या कार्यक्रम भरणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात रात्री आठ ते दहा या वेळेत होत असून, सदर कार्यक्रम हा लोकसहभागातून व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे गावातील प्रत्येक समाजातील नागरिकांना रामलीला कथेत श्रीराम प्रभू राम लक्ष्मण सीता यांच्या आरती व पुजनाच्या मान प्रत्येक गावकऱ्यांना दिला जातो त्याचप्रमाणे काल गावातील मुस्लिम समाजातील युसुफ प्रकाश जैनोदिन पिंजारी या युवकाने श्रीराम प्रभू पूजनाचा आरतीचा मान देण्यात आला यामुळे गावात राम कथेतुन हिंदू मुस्लिम एकजुटीचे दर्शन दिसून येते गावात कुठलाही कार्यक्रम हिंदूंचा असो का मुसलमानांचा कार्यक्रम गावकरी प्रत्येक उत्सवात भाग घेऊन हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवून आणतात व भडणे येथील एकतेचे प्रतिक धार्मिक कार्यक्रमातून दिसून येतो असाच उपक्रम गावात मुस्लिम समाजाचा सण उत्सव राहिल्यास रोजा ईद या सणात हिंदू बांधव शुभेच्छा येतात व त्यांच्या समाज सहभाग घेऊन सहभागी होतात भडणे येथे पाच दिवस पासून चालू असून यात प्रत्येक व्यक्तीला सहभाग घेतला कार्यक्रम दिसून येत आहे यशस्वी करण्यासाठी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, ग्रामपंचायत सोसायटी दूध डेरी सदस्य ग्रामस्थ महिला पुरुष मंडळ तरुण मंडळ व भजनी मंडळ सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे,,,,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed