

प्रत्येक स्तोत्राचा हेतु समाजहितच आहे. मा. व्रजेशची पंडित यांनी आज दि. 24/3/2023 रोज़ी संस्कृत भारती व संस्कृत प्रसारिणी सभा जलगाव यांच्या तर्फे शिरुडे क्लासेस् श्यामसुंदर काँलनी येथे श्री गणपती अथर्वशीर्ष- एक ‘वैज्ञानिक दृष्टीकोन‘ या विषयावर व्याख्यान झाले. मा. व्रजेशजी पंडित (व्याकरणाचार्य) यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, या जगात कोणतेही कार्य विना कारण होत नसते . प्रत्येक कार्या मागे काहीना काही उद्देश असतोच तसेच ब्राह्मण, संहिता, ब्राह्मण, आरण्यक व उपनिष म्हणजेच वेद होय. संसारातील प्रत्येक ज्ञानाचा आधार किंवा प्रमाण हे प्रस्थानानत्रयी ‘श्रीमद्भगवद्भीता , उपनिषद व ब्रह्मसूत्र) आहेत. या माध्यमातून श्री गणपती अथर्वशीर्ष चे खूप मार्मिक व वैज्ञानिक मार्गदर्शन केले तसेच सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान मा.ॲड. सुशिलजी अत्रे यांनी भूषविले.या प्रसंगी सुशिलजींच्या मातोश्री यांनी उपस्थिती दिली. संस्कृत प्राचारिणी सभेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील देखील उपस्थित होत्या. या शुभप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संस्कृत विषय शिक्षिका सौ. पल्लवी जोशी व संस्कृत विषया साठी विषेश कार्य करणारे श्री.विजय शुक्ल मंचावर उपस्थित होते. दिप प्रज्वालन प्रसंगी मंगलाचरण चि. अथर्व मुंडले यांनी गायले. प्रास्ताविक श्री. श्रीश् चिपळोणकर व सूत्र संचालन डॉ. अखिलेश शर्मा व आभार प्रदर्शन सौ। सुरेखा शिवरामे यांंनी
केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्कृत भारतीचे श्रीश् चिपळूणकर प्रचारिणी सभेच्या अध्यक्षा सौ. शोभाताई पाटील ,डॉ. महेंद्र शिरुडे, सौ प्राजक्ता शिरुडे, प्रा. डॉ. अखिलेश शर्मा, प्रा. अर्जुन शास्त्री, प्रा. गुरुदत्त महाजन, सौ. हर्षदा उपासनी, श्रीमती सारिका बोरसे, पंकज ‘वर्हाडे यांनी सहकार्य केले.