मानवसेवा हीच ईश्वरसेवा, आधार एक हात मदतीचा , कल्याण येथील दिव्यांग भगिनींना राष्ट्रीय महिला दिनानिमित्त साड्या देऊन सन्मान, मनिलाल शिंपी हे दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणास्थान आहेत::अशोक भोईर



ठाणे( प्रतिनिधी )मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रूपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा नेतृत्वाखाली लेडिज एक्स्प्रेस ग्रुपचा प्रमुख श्रीमती मधूबेन ठक्कर,श्रीमती विभाबेन जैन , स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेशभाई ठक्कर,यांचा सहकार्याने ६० अपंग दिव्यांग भगिनींना साड्या देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अपंग शिक्षण मंडळाचा अधिकारी शिंदे मॅडम, प्रमोद पवार, उपस्थित होते.अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आदरणीय अशोक भोईर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की , मानव सेवेचे व्रत घेतलेले तपस्वी डॉ. मणिलाल शिंपी हे आमच्या दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्रभर खोल ना फुलाची पाकळी मदत उपलब्ध करून देत असतात. आजही त्यांनी लेडीज एक्स्प्रेस ग्रुपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसताना आमच्या दिव्यांग भगिनींसाठी साड्या देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करून आम्हाला सरप्राइज दीले आहे. खरोखर मनिलाल शिंपी यांचे कार्य हे आमच्यासाठी एक वरदान आहे. मनिलाल शिंपी यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी खूप महान नाही, मी फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा प्रेरणेने मानवसेवा घडवून आणण्यासाठी पोस्टमनचे काम करीत आहे. लेडीज एक्स्प्रेस ग्रुप चा प्रमुख मधुबेन ठक्कर, विभा जैन, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, डॉ.रामचंद्र देसले, किशोर अढळकर, नटवर वर्मा आणि या ग्रुपचा माध्यमातून मदत करणारे दानशूर दाते हेच खरे देवदूत आहेत. यांच्यामुळेआहेत.तसेच दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे. शेवटी शिंपी सरांनी दारूबंदी वर आधारित प्रार्थना बोलून सर्वांचे मनोरंजन केले. अशोक भोईर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.