• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

चैत्रोत्सव व श्रीराम जन्मोत्सव निमित्त पाडळसरेत येथे हरिनाम कीर्तन सप्ताह

Mar 27, 2023

Loading

चैत्रोत्सव व श्रीराम जन्मोत्सव निमित्त पाडळसरेत येथे हरिनाम कीर्तन सप्ताह

हनुमान जयंती साजरी करून कल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद वाटून सांगता

अमळनेर ( प्रतिनिधी )

श्रीक्षेत्र पाडळसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाच्या प्रारंभ निमित्त श्रीराम जन्मोत्सव व ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर म्हणून दिनांक २९ पासून चैत्रोत्सव साजरा केला जातो , व शेवटी हनुमान जयंतीला दिनांक ६ रोजी काल्याचे कीर्तनाने महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता होते
नववर्षाच्या स्वागतार्थ चैत्रोत्सवात ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर , श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जयंतीच्या मिलाप म्हणून श्रीक्षेत्र पाडळसरे येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत महापुराण कथेला अंबिका देवीच्या मंदिरात विधिवत गुढी उभारून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्त्या ,श्रीमद भागवत ,गीता व देवी भागवत ग्रंथ स्थापित करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास दिनांक २९ रोजी देवीची अष्टमीला सुरुवात होईल, त्यात दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे राहतील दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती , देवीची आरती तर दुपारी १ ते ३ देवीचा नामजप ,सायंकाळी ५ते ६ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०;३० पर्यंत जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम व देवीचा जागर होईल , हरिनाम कीर्तन सप्ताहात आळंदी येथील नामवंत कीर्तनकार यांची उपस्थिती लाभणार आहे यात दिनांक २९ रोजी हभप भोला महाराज (पाडळसरेकर )यांचे कीर्तन होईल ,दिनांक ३० रोजी हभप श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात तुकाराम महाराज खोक्राळेकर कीर्तन करतील,दिनांक ३१ रोजी हभप प्रमोद महाराज धुळेकर ,दिनांक १ रोजी हभप शामसुंदर महाराज घोडगावकर ,दिनांक २ रोजी हभप जयेश महाराज निमकर ,दिनांक ३ रोजी हभप धनराज महाराज मेहुटेहुकर , दिनांक ४ रोजी हभप श्रीराम महाराज भोणेकर यांचे कीर्तन होईल तर दिनांक ५ रोजी दुपारी ४ ते ६ पालखि सोहळ्याची मिरवणूक होऊन रात्री भावेश महाराज विटनेरकर यांचे जागरचे कीर्तन होईल व दिनांक ६ रोजी हनुमान जयंती साजरी करून सकाळी ८ ते १० यावेळेस हभप भावेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे मानकरी हभप रघुनाथ देवचंद पाटील यांच्याकडून महाप्रसाद वाटप करून कीर्तन सप्ताहाची सांगता होईल,कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व हभप ताराचंद पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *