• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कै.यशोदाबाई तुळशीराम वावगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Mar 29, 2023

Loading

कै.यशोदाबाई तुळशीराम वावगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

मुक्ताईनगर येथील कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गोदावरी नगर मुक्ताईनगर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी 49 रुग्णांनी याचा लाभ घेतला यावेळी मुक्ताई आय केअर सेंटरचे संचालक डॉ. सुनील मेश्राम यांनी या रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी पाच रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासण्यात आल्या याप्रसंगी श्री तुळशीराम वावगे श्री संतोष दसरे तसेच श्री रामधन वानखेडे, यशोदाबाई सातव, श्री पंकज सातव, कुसुमबाई कापसे, शोभाताई तायडे, सुमनबाई तायडे, अर्चना खोड, श्री माधव तायडे, श्री माधव राऊत, शशिकला वंनेरे,श्री प्रल्हाद तायडे आदी वावगे कुटुंबिय, नातेवाईक मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होते तसेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर श्री उमेश सोनार, आरोही लॅब मुक्ताईनगरचे डॉ. श्रीकांत दहिभाते यांची सुध्दा उपस्थिती होती. उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे स्मृती प्रित्यर्थ गाव गाव फिरते वाचनालयाचा उपक्रम मुक्ताईनगर तालुक्यामध्ये प्रारंभ करण्यात आलेला आहे आतापर्यंत तालुक्यातील कु-हा भागातील बारा गावांमध्ये हा उपक्रम गेल्या पंधरा दिवसापासून राबवण्यात येत आहे तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये हा उपक्रम पोहोचवला जाईल तालुक्यातील एमपीएससी यूपीएससीचे विद्यार्थ्यांसाठी ह्या गाव गाव फिरत वाचनालयामध्ये पुस्तक असून याचा उपयोग विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा होत आहे त्याचप्रमाणे कथा, कविता, कादंबरी ,बाल साहित्य, बाल संस्कार, वैचारिक, धार्मिक अशा पुस्तकांचा सुद्धा या उपक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *