जि.प.आरोग्य कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण सभा सम्पन्न
सभेतील प्रश्न गंभीर आहेत पण याकडे अधिकारी किती गंभीरपणे पाहते.???


आज बऱ्याच वर्षानंतर जिप.आरोग्य कर्मचारी यांच्या स्थानिक प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात,प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे साहेब, डॉ.मनीषा बांगर मॅडम,प्र.अधिकारी डॉ.राजेश जैन,कक्ष अधि-दिनेश झोपे,स.कक्ष अधि-जितेंद्र सोनवणे, कांतीलाल पाटील, मनोज पाटील, अर्थ विभाग-शर्माजी आणि सर्व कनिष्ठ सहाय्यक यांच्या उपस्थितीत.. जळगांव जिल्ह्यातील आमंत्रित असलेले प्रमुख सर्व जिप आरोग्य कर्मचारी संघटनेचे सर्व जिल्हाअध्यक्ष व राज्य/जिल्हा पदाधिकारी होते, तथा मराजीप आरोग्य सेवा कर्मचारी २५७/८९ संघटनेचे अध्यक्ष-विजय देशमुख,मुख्य सचिव-संजीव पाटील, कोषाध्यक्ष-प्रेमलता पाटील, कार्यध्यक्ष-राजेश कुमावत, उपाध्यक्ष-अजित बाविस्कर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सह उपस्थित होते…
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांचा मुख्यतः
१)आरोग्य कर्मचारी वर्गाचा गंभीर आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे, उशिरा होणारे वेतन, तसेच सर्व हेड सह निधी लवकर उपलब्ध करून देणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांशी चर्चा करून तोडगा काढणे बाबत आश्वासन दिले,
२)बऱ्याच महिन्या पासून १०/२०/३० चे प्रलंबित कालबद्ध फरकाच्या रकमा गेल्या ६ ते ७ महिन्या पासून मिळाल्या नाहीत त्यासाठी त्वरित मागणी करणार आहेत,
३)ग्रामीण भागातील ANM बघिणी सोबत काम करीत असलेली अर्धवेळ परिचारिका बघिणीचे वेळेत मानधन साठी निधी मिळणेस प्रयत्न करणार,
४)anm/mpw/ha/lhv/eoh/औषध निर्माण अधिकारी इतर सर्वच केडर यांचे प्रलंबित असलेले १०/२०/३० च्या कालबद्ध प्रकरण पुढच्या महिन्यात लवकर पूर्ण मार्गी लावणेसाठी अस्वस्थ केले आहे,
या अनेक प्रश्नासह मागण्या त्वरित मंजुर होतील असे DHO सर यांनी सांगितले व वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या समिती गठन करण्याचे नियोजन देखील माता बाल संगोपन अधिकारी डॉ बांगर मॅडम यांनी सांगितले,
५) दुसरा/चौथा शनिवार सुटी बाबत लवकरच पत्र काढन्यात येईल,
६) शिकाऊ काळ व हिंदी-मराठी भाषा सूटचे राहिलेले बरेच प्रकरण हे त्वरित काढणेत येतील.
७)anm/lhv/mpw/ha/eoh यांची पदभरती पूर्वी, माहे मे२०२३ च्या आतील संभाव्य रिक्त जागा उपलब्ध करून त्याठिकाणी पदोन्नती होणाऱ्यास प्राधान्याने तेथे पदोन्नती देणेबाबत होकार दिला,
८)प्रत्येक कर्मचाऱ्याला दुय्यम सेवा पुस्तक मिळणे,
९) दर महा वेतनाच्या पावत्या मिळावयात,
१०) भविष्य निर्वाह निधीचे बिलं त्वरित मिळणे प्रयत्न केला जाईल,
११) प्रत्येक कर्मचऱ्याना दर वर्षी आपली सेवा जेष्टता सुची वेळेवर अपडेट करून दर वर्षी लवकर प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले,
१२)महिला मधून eoh पदोन्नती साठी GNM व LHV यांच्या मधून जेष्टता नुसार सम समान संधी मिळावी,
१३) पाणी नमुने/स्रोत सर्वेक्षण घेणेसाठी mpw हे जर काम करतात तर आपल्या स्तरावरून mpw यांना मानधन मिळावे,
१४) ANM भगिनी यांचे सहा महिन्यांसाठीचे LHV पदाचे प्रशिक्षण साठी राहणे साठी/जेवणासाठी मानधन मिळावे.
१५) जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात NCD च्या इंसेंटिव्ह करिता CHO/आशा यांच्या प्रमाणे दरमहा इंसेंटिव्ह त्यांच्या सोबतच मंजुरी देण्यात यावी, त्यातही ती जिल्ह्यवरून आरोग्य कर्मचऱ्याना डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा केले जाण्याचं संकेत दिले.
या व इतर अनेक प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी,
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे व माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा बांगर मॅडम यांनी सर्व संघटना अध्यक्ष व पदाधिकारी यांना मागण्या मार्गी लावण्याबाबत अश्वासीत केले आहे.
शेवटी जुनीपेन्शन योजनेचा संपात राज्यांचे राजपात्रीत अधिकारी संघटना यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, त्याबद्दल सर्व अधिकारी यांचे आभार मानले.
सदरील आरोग्य कर्मचारी वर्गाची तक्रार निवारण सभा खेडी मेडीच्या वातावरणात सम्पन्न होऊन आरोग्य कर्मचारी यांच्या जिल्ह्यास्तराच्या वरील प्रलंबित प्रश्न व त्याना दिलेल्या आश्वासनाचकडे,
हे अधिकारी / प्रशासन किती गंभीरतेने दखल घेते, यावर सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.