
ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत नोंदणी मुदत होती.
वेळेत नोंदणी न करू शकलेल्या शिक्षकांना 20 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
31 मार्च 2024 पर्यंत सेवेची 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
पात्र शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षण नोंदणी लिंक
https://training.scertmaha.ac.in
प्रशिक्षण तपशील खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे
www.maa.ac.in