• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

उपशिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजार रुपयाची लाज घेतांना एरंडोल हायस्कूलचे अध्यक्ष, मुख्याध्यापक लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..

Jun 14, 2023

Loading

उपशिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजार रुपयाची लाज घेतांना एरंडोल हायस्कूलचे अध्यक्ष, मुख्याध्यापक लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..

जळगांव प्रतिनिधी
यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ४०,
रा.पाचोरा, ता.पाचोरा जि.जळगाव.
▶️ आलोसे-
१) विनोद शंकर जाधव, वय-४२ वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव. वर्ग-२
रा.योगेश्वर नगर,कजगाव रोड,पारोळा ता.पारोळा जि.जळगाव.
२) नरेंद्र उत्तम वाघ, वय-४४ वर्ष, कनिष्ठ लिपीक, महात्मा फुले हायस्कुल,एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव. वर्ग-३
रा.समर्थ नगर,भडगाव रोड,पाचोरा, ता.पाचोरा जि.जळगाव.
३) विजय पंढरीनाथ महाजन, वय-५६ वर्ष, अध्यक्ष, श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव.
रा.माळी वाडा, एरंडोल, ता.एरंडोल जि.जळगाव.
▶️ लाचेची मागणी-
७५,०००/-रुपये एक पुर्ण पगार चेक स्वरूपात
▶️ लाच स्विकारली- ७५,०००/-रुपये एक पुर्ण पगार चेक स्वरूपात आलोसे क्रं.१ मुख्याध्यापक यांचे नावे असलेला
▶️ हस्तगत रक्कम- ७५,०००/-रुपये एक पुर्ण पगार चेक स्वरूपात आलोसे क्रं.१ मुख्याध्यापक यांचे नावे असलेला
▶️ लाचेची मागणी –
दि.१३/०६/२०२३
▶️ लाच स्वीकारली
दि.१४/०६/२०२३ रोजी
▶️ * लाचेचे कारण*
यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि.०१/०४/२०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल,धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि.०२/०५/२०२३ रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता. सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्रं.१ व २ यांनी तक्रारदार यांचेकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी व इलोसे क्रं.३ यांच्यासाठी दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना ७५,०००/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले व इलोसे क्रं.३ यांनी आलोसे क्रं.२ यांच्या मोबाईल फोनवरून तक्रारदार यांना आलोसे क्रं.१ व २ यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगून प्राप्त करण्याचा प्रयत्न करून प्रोत्साहन दिले. व मागणी केल्याप्रमाणे ७५,०००/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक आलेसे क्रं.१ यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.8766412529
▶️ सापळा व तपास अधिकारी-
एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं. 8691824333
▶️ सापळा पथक-
पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे.
▶️ कारवाई मदत पथक-
श्री.एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
मोबा.नं.98231 28038
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
▶️ मार्गदर्शक- 1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
2) मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
2) मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.आयुक्त सो, शिक्षण संचनालय मध्यवर्ती इमारत, पुणे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529

@ टोल फ्रि क्रं. 1064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed