• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर शहरात अफवा पसरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष

Jun 15, 2023

Loading

अमळनेर शहरात अफवा पसरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष

अमळनेर शहर आज स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी केले बंद…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरात कोणताही अनुचित प्रकार आज दिनांक १४-०६-२०२३ रोजी घडलेला नसून अमळनेर शहरात शांतता आहे.
केवळ अफवांमुळे गावात पळापळ झाली आहे. तरी कुणीही घाबरून जाऊ नये. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी (जागो-जागी) चौकात सीसीटीसी (CCTV) कॅमेरे बसविण्यात आले असल्याने जो कोणी गैरकृत्य करेल अथवा शहराची शांतता भंग करेल अशांचे सीसीटीव्ही फुटेज काढून कठोर कारवाई करण्यात येईल.* त्यामुळे कोणीही सोशल मीडियावर अफवांचे मेसेज अथवा अफवा पसरवणार नाहीत आपल्या सुरक्षिततेसाठी अमळनेर पोलीस (जळगाव पोलीस) प्रशासन सज्ज आहे विजय शिंदे पोलीस निरीक्षक
अमळनेर पोलीस स्टेशन यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

स्वयंस्फूर्तीने बंद

अमळनेर शहरात शांतता प्रस्थापित व्हावी , कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अनेक शाळा , नागरिक , व्यापारी यांनी दिनांक १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया नागरिकांनी सहकार्य करावे. विनाकारण गावात फिरू नये , अफवा पसरवू नये, शांतता कायम ठेवावी त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांकडून ,आमदार अनिल पाटील
व शहरातील सामाजिक संघटना पत्रकार संघटना यांनी आवाहन केले आहे..

अमळनेर दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू

अमळनेर शहरातील दंगली प्रकरणातील अटकेत असलेला संशयित आरोपी माजी नगरसेवक सलीम टोपी यांचा तो मुलगा अश्फाक शेख(33) वैद्यकीय उपचारानंतर याचा बुधवारी मृत्यू झाला. वरील माहिती मिळताच अमळनेर शहरांमध्ये तनावपूर्ण शांतता निर्माण झाली .पोलीस यंत्रनेचा तात्काळ संपर्क झाल्याने तणावपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यात आली व सर्व शहरातील नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका व कोणी अफवा पसरवत असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

उद्या शरद पवारांचा दौरा व राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय शिबीर

उद्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर मंत्री पुढारी येणार आहेत. अमळनेरात तणावपूर्ण शांतता असल्याने राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रम दौरा होईल का? यामध्ये लोकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमाची तयारी करतांना दिसत आहे. अगोदरच अमळनेरला
पोलिसांची संख्या कमी असल्याने कामाचा ताण मोठा आहे यात असे मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे पोलिसांवर मोठा ताण पडत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed