
जागतिक मल्लखांब दिनानिमित्त जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न :-
जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशन व एकलव्य क्रीडा संकुल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मल्लखांब दिनानिमित्त जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुलात करण्यात आले होते या स्पर्धेचे उदघाटन जळगाव जिल्हाॲथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी निलेश पाटील यांचे हस्ते जळगाव जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष सचिन महाजन यांचे उपस्थितीत करण्यात आले स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा धर्मदाय आयुक्त श्री मोहन गाढे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल.एस.तायडे, भोकर येथील आर.एन.लाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री उत्तम चिंचाळे, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत कोल्हे, जळगाव जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे सचिव श्री दिलीप गवळी, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव श्री योगेश सोनवणे, जळगाव जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव श्री अजय काशिद, जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव श्री जितेंद्र शिंदे, जळगाव जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील, जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे सहसचिव NIS टेबल टेनिस प्रशिक्षक श्री विजय विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले स्पर्धेत पंच म्हणून जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशनचे वरिष्ठ सहसचिव प्रशिक्षक श्री नरेंद्र भोई, श्री विजय विसपुते, श्री धनराज,सौ चारुलता भोई यांनी केले. स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा आशिषकुमार चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
