• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे शासनाकड़े प्रलंबित बिल मिळण्याबाबत माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्फत शासनाला निवेदन ….

Jun 24, 2023

Loading

सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे शासनाकड़े प्रलंबित बिल मिळण्याबाबत माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्फत शासनाला निवेदन ….

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे शासनाकडे प्रलंबित असलेले बिले १) उपदान शुल्क २) अंश राशीकरण रकमा ३) इतर देयके ४) सातवे वेतनचा
पहिला/दुसरा/तिसरा हप्ता ५) जिल्हा परिषद आदर्श पेंशाणार शिक्षकांना एक जादा वेतन
वाढ ६ मेडिकल बिल ७) सोग्रम भत्ता ७) आगाऊ वेतन वाढ ८) प्रलंबित असलेले बिले
आज़ तागायत अनेक वेळा मागणी करून देखील अद्याप पर्यंत रकमा मिळाल्या नाही.
जिल्हा परिषद मध्ये तपास केला असता त्यांचे एकाच उत्तर असते शासनाकडून रक्कम
अद्यापत प्राप्त झाल्या नाही. त्या प्राप्त झाल्यावर ते देण्यात येईल असे उत्तर मिळते. तरी.
आपल्या स्तरावरून शासन आपल्या दारी या सदराखाली आपल्याकडे योग्य त्या
निर्णयाची अपेक्ष आहे, अश्या आशयाचे निवेदन जळगांव जिल्हा निवृत्त सेवा संघ च्या माध्यमातून माजी विधानपरिषद सदस्य स्मिताताई वाघ यांना देण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,कार्याध्यक्ष प्रल्हाद सांगोळे,सचिव भालचंद्र खंडेराय, चिंधु वानखेडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed