• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात ‘ भावार्थ पुस्तक व्हॅनला ‘ विद्यार्थीनींचा उस्फुर्त प्रतिसाद

Sep 5, 2023

Loading

अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात ‘ भावार्थ पुस्तक व्हॅनला ‘ विद्यार्थीनींचा उस्फुर्त प्रतिसाद
[ टि.डब्ल्यू.जे.फाऊंडेशन चिपळूण संस्थेचा राज्यस्तरीय प्रेरक उपक्रम ]
टी.डब्ल्यू.जे.फाउंडेशन चिपळूण संस्था मराठी वाचन संस्कृती जोपासणे व वाढविणे या उद्दिष्टाने ‘ भावार्थ ‘ हे पुस्तकांचे फिरते व्हॅन वाचनालय हा अभिनव उपक्रम महाराष्ट्र स्तरावर कानाकोपर्‍यातील गावोगावी,शहरात अखंडपणे राबवित आहे.वाचनाचा चालता फिरता आनंद देणाऱ्या या उपक्रमाला शाळा व महाविद्यालय स्तरावर प्रचंड मागणी होत आहे.
अण्णासाहेब जे.डी.बेंडाळे महाविद्यालयात सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी भावार्थ पुस्तक व्हॅन उपक्रमाचे उद्घाटन फित कापून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गौरी राणे यांनी केले.त्या प्रसंगी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक विभाग ) शशिकांत हिंगोणेकर ,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे,नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनिअर कॉलेज प्राचार्य प्रा.चारुलता पाटील,उपप्राचार्य सुजाता नेमाडे,बेंडाळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्हि.जे.पाटील व उपप्राचार्य डॉ.पी.एन. तायडे,मराठी विभाग प्रमुख डॉ.सत्यजित साळवे,प्रा.दीपक पवार,प्रा.रिना पवार,डॉ.सुहास चौधरी,प्रा.आर.पी.मोरे,प्रा.योगेश कोळी,प्रा.निलेश कोळी, पर्यवेक्षक पी.व्हि.वाणी,समन्वयक राहुल वराडे उपस्थित होते.
उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉक्टर राणे म्हणाल्या की ” वाचन संस्कृती रुजण्यासाठी भावार्थ हा राज्यातील अत्यंत प्रेरक उपक्रम असून मोबाईल युगात हरवलेल्या युवा पिढीला अवांतर वाचनाची गोडी रुजवून ज्ञानसन्मुख करण्यात या उपक्रमाचा सिंहाचा वाटा आहे.फिरत्या वाचनाचा उपक्रम आमच्या शाळेत मिळाल्याबद्दल आम्ही सुदैवी आहोत.”
प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,” भावार्थ उपक्रमामुळे ग्रंथजागर घरोघरी पोहोचेल.दर्जेदार ग्रंथ वाचनातून निश्चितच संस्कारशील व सुजाण पिढी निर्माण होईल.”


  • ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांची
    निर्लेप संकलनात्मक ग्रंथसेवा *
    महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाज संघाला यावर्षी दीडशे वर्ष पुर्ण होत आहेत त्या निमित्ताने प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि लेखक, रसिकांना सदरहू भावार्थ मोफत वाचनालयासाठी ग्रंथ भेट देण्यासाठी विजय लुल्हे यांनी कळकळीचे आवाहन केले. त्या निःस्वार्थी आव्हाहनाला प्रतिसाद देत ग्रंथ प्रेमींनी तब्बल दहा हजारांची पुस्तके विजय लुल्हे यांच्याकडे विश्वासपूर्वक सोपविली.
    ग्रंथदान करणारे प्रमुख ग्रंथदाते : –
    दिपस्तंभ प्रकाशन – ५३९० रुपये,अथर्व प्रकाशन – १५२० रुपये, वैयक्तिक ग्रंथदाते- साहित्यिक प्रा.व.पु.होले सर ,सुप्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर,विजय लुल्हे,चित्रकार सुनिल दाभाडे, सचिन प्रल्हाद खरे
    विजय लुल्हे यांनी संकलित सदरहू १०००० किमतीची दर्जेदार व पुरस्कृत ग्रंथसंपदा मोफत भावार्थ वाचनालयासाठी भावार्थ पुस्तक व्हॅन व्यवस्थापक भालचंद्र पवार व वैभव काटदरे यांच्याकडे विनम्रपणे सुपूर्द केली.
    *प्रस्तावना वैभव काटदरे यांनी केली.भावार्थ पुस्तक व्हॅन फिरते वाचनालय व्यवस्थापक भालचंद्र पवार व वैभव काटदरे यांनी विद्यार्थिनींना वाचनालयाची उद्दिष्टे व संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मोफत वाचनालयासंबंधी विशेष माहिती दिली. कार्यक्रमास सुजीत चौधरी, कलाशिक्षक एन.ओ.चौधरी,दिप्ती चौधरी यांसह शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते.
    ग्रंथप्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थीनी व नंदिनीबाई ज्युनिअर कॉलेजच्या सहाशे विद्यार्थीनींनी वाचनानंद व पुस्तक सहवासाचा अतुलनीय लाभ घेतला.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,सहसचिव तथा व्याख्याते व.पु.होले सर आणि प्रशासकीय अधिकारी सतीश चौधरी तसेच भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे,टि.डब्ल्यू.जे.जळगाव शाखा व्यवस्थापक मिलींद पाटील व उपव्यवस्थापक गुरुदास पाटील यांनी अमूल्य सहकार्य केले. पुस्तकालयाच्या सुसूत्रतेसाठी आर.एम.विशाल अलकरी,केतन पाटील,आदर्श वालापूरे ,पवन धनगर ,ए.एम.शुभम महाजन,दिनेश माळी,आदरतिथ्य विभाग प्रमुख अभिनेश सावंत व प्रथमेश गुजर या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.सुत्रसंचालन मृणाल टापरे व आभार प्रदर्शन प्रतिक्षा गणवीर या कर्मचारींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *