

माजी आमदार डॉ बी एस पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश…
येणाऱ्या निवडणुकीत डॉक्टर पाटील मुळे अमळनेरचे गणित बदलणार….
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)
भाजपचे पंधरा वर्षे आमदार म्हणून ज्यांनी काम पाहिले अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होती नंतर नंतर त्यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता नंतर त्यांनी भाजपमध्ये घर वापसी केली.. सध्याच्या महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना वीट आला काल राष्ट्रवादीचे सदा सर्वे शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा होती तेथे ते जाऊन राष्ट्रवादी पक्षांची चर्चा विनिमय करून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला त्यांचे स्वागत करण्यात आले पक्षाने त्यांच्यावर जेष्ठ व अनुभवी म्हणून जबाबदारी टाकली आणि राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्तीपत्र त्या ठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले यावेळी अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, गुलाबराव देवकर ,राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, प्रदेश महिला प्रमुख तिलोत्तमाताई पाटील , राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील ,शहर अध्यक्ष श्याम पाटील व डॉक्टर बी एस पाटील यांच्यावर प्रेम करणारे अमळनेर येथील त्यांचे कार्यकर्तेही व
सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर पाटील यांच्या प्रवेशाने अमळनेर मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष
राष्ट्रवादी पक्षाचे सदा सर्वे शरदचंद्रजी पवार यांनी नाळ ओळखत डॉक्टर पाटील यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे मितभाशी अभ्यासू आहेत याचा फायदा येणाऱ्या विधान सभा,लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत होऊ शकतो हे ओळखून त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली व डॉक्टर पाटील च्या सर्व कार्यकर्त्यांनी अमळनेर मध्ये त्यांचे अभिनंदन व जल्लोष केला.
डॉक्टर पाटील यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमळनेरचे गणित निवडणुकीचे बदलेल हे तेवढेच सत्य आहे. डॉक्टर पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. डॉक्टर पाटील मुळे अमळनेर तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येतील असे अमळनेर शहरांमध्ये व तालुक्यात चर्चा आहे.