
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कृष्ण जन्माष्टमी कृष्णाच्या जन्माचा प्रसंग ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.या पाश्र्वभूमीवर अमळनेरला श्री छत्रपती चौक, स्वामी समर्थ मंदिरा जवळ, अमळनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण कृ।।७ शके १९४५ बुधवार दि.०६।९।२०२३ रोजी रात्री ८ ते १२ वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपली 1 सहकुटूंब सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण
श्री छत्रपती चौक, स्वामी समर्थ मंदिरा जवळ, अमळनेर जि. जळगांव
-: आपले विनीत :-
श्रीमती मिराबाई मधुकर पाटील श्री. लोटन मधुकर पाटील
सौ. प्रतिभा लोटन पाटील
चि. सौरभ लोटन पाटील ८४५९५३७२२१,९०२१२२७६४९