• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

संघटनेची जोड मिळाल्याशिवाय कर्मचारी सुरक्षित नाही-
अनिल सुरडकर

Sep 7, 2023

Loading

संघटनेची जोड मिळाल्याशिवाय कर्मचारी सुरक्षित नाही
अनिल सुरडकर
जळगांव प्रतिनिधी-नोकरीत कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना, सामान्य माणूस आणि त्याच्याशी निगडित असणारी काम, गोरगरीब वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारा कर्मचारी हा आपल्या जीवनामध्ये समाधानी असला तरी कार्यरत असताना त्याच्या नोकरीत संघटनेची जोड असल्याशिवाय तो सुरक्षित नसल्याचे मत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय माजी अध्यक्ष अनिल सुरळकर यांनी कर्मचारी बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सत्यजित साळवे होते ते याप्रसंगी बोलताना म्हणाले कर्मचारी संघटनांसाठी सक्षम असं नेतृत्व आपल्या विभागातून जळगाव जिल्ह्यातून मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे संघटन हे सुरक्षित आणि व्यवस्थित होईल त्यासोबतच कर्मचाऱ्याला आपल्या न्याय हक्कांची बाजू भक्कम करण्याकरता त्याच सोबत कार्यरत असताना लोकप्रतिनिधींकडून अथवा काही व्यक्तींकडून मुद्दाम होणाऱ्या जाचास, त्रासास किंवा बेकायदा काम करण्यासाठी टाकलेला दबाव हे संपविण्यासाठी कर्मचारी संघटना सक्षम करण्यासाठी प्रयत्न होण्याबरोबरच कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कायद्याचा अभ्यास सक्षमपणे असणाऱ्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने पुढे आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले बैठकीत नुपम मेढे, संजय निकम, आर. टी. सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, मुकुंदा इंगळे,रमेश सोनवणे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. बैठकीस मुकुंदभाऊ सपकाळे, मनोहर लोखंडे, सोमा भालेराव, गोपाल सोनवणे, विजयकुमार मौर्य, प्रताप बोदडे ,सुनील सोनवणे ,ज्ञानेश्वर बोरसे, सुरेश वाडे, आर.बी. शिरसाट, संदीप शिरोळे, महेंद्र केदार व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार प्रदर्शन किशोर म्हस्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *