• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप महाविद्यालयातील स्टुडन्ट युनिटचे उद्घाटन व बुकलेट स्पर्धेचे आयोजन

Sep 8, 2023

Loading

अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्रताप महाविद्यालय, अमळनेर व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ सप्टेंबर रोजी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात स्टुडन्ट युनिट चे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विभागात संख्याशास्त्र विषयावर विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यावर आधारित बुकलेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थी यावेळी बुकलेट स्पर्धेत ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख प्रा. एस. ए. जोशी यांनी अतिथींना विभागाविषयी माहिती दिली. बुकलेटच्या माध्यमातून अतिशय सुंदर आकर्षक पद्धतीने सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील अनेक पैलू सादर केले. प्राचार्य व सहसचिव यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहिले व विद्यार्थ्यांची व विभागाची प्रसंशा केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वैशाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी, प्रा. नूतन बडगुजर ,प्रा. आदित्य संकलेचा, प्रा. चैताली सोनार, प्रा. नेहा पवार, प्रा. प्रीती देशमुख, प्रा. मंजुषा मराठे, प्रा, प्राजक्ता चौधरी, प्रा नेहा महाजन, प्रा. स्नेहल सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमासाठी प्रयोगशाळा परिचय विलास पाटील, किशोर सोनार यांचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुषा मराठे यांनी केले. तर आभार प्रा. चैताली सोनार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *