डॉ. प्रभाकर गायकवाड यांना
“उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” प्रदान

औरंगाबाद: येथील डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचे डॉ. प्रभाकर गायकवाड यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्रातील नामांकित मराठवाडा लिगल ऍण्ड जनरल एज्युकेशन सोसायटीने घेऊन त्यांना “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” प्रदान केला. हा पुरस्कार प्रसिद्ध व जेष्ठ विधिज्ञ एम. एल. ऍण्ड जी सोसायटीचे अध्यक्ष श्री ऍड. जयंत वासडीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सचिव ऍड. डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर, ऍड. राजेंद्र देशमुख, निवृत्त न्यायाधीश एस . डी. कुलकर्णी, ऍड. एस. के कुलकर्णी, सहसचिव धनंजय कुलकर्णी, श्री रविंद्र जोशी , श्री सी. आर. देशपांडे, आदींनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार निमित्ताने डॉ.ऍड. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी संस्थेच्या वतीने , या शैक्षणिक वर्षासाठीचा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” जाहीर करताना मनस्वी आनंद होत आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे आमच्या संस्थेसाठी उत्कृष्ट अध्यापन, मार्गदर्शन आणि निरंतर योगदान देणाऱ्या शिक्षक योगदानाचे प्रतीक आहे.
सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे विजेते डॉ.सौ. आय. बी. पी. काॅलेजचे डॉ. प्रभाकर गायकवाड आणि एम.पी.लॉ कॉलेजच्या डॉ. अपर्णा कोतापल्ले
आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभिप्राय, शैक्षणिक यश आणि आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये होणारा अध्यापनाचा प्रभाव या सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हे शिक्षक सातत्याने आमच्या महाविद्यालयाच्या आदर्शांना मूर्त स्वरुप प्राप्त व्हावे म्हणून सदैव उभे राहिले आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या उत्कृष्ट समर्पणाबद्दल आम्ही हा पुरस्कार प्रदान केला आहे.
उद्याच्या भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या अथक प्रयत्न व वचनबद्धतेबद्दल आम्ही आभार मानतो. शिक्षकांची शिकवण्याची आवड हाच आमच्या संस्थेच्या यशाचा पाया आहे. असे डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी प्रतिपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुनिता बाजपाई यांनी डॉ प्रभाकर गायकवाड यांच्याविषयी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या कि, एक उत्तम शिक्षक कसा असावा याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालुन दिला आहे. प्राचार्य, कार्यालय, सहकारी शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी अत्यंत समुहभावनेने ते कार्य करत गेले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. संस्थेने त्यांच्या कार्याची अल्पावधीतच दखल घेतली ही महत्वपूर्ण बाब आहे. तसेच माजी प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित अभिनंदन संदेशात म्हणाल्या कि, तुमच्या स्वभावातील सुसंस्कृतपणा, प्रामाणिकपणा, निगर्वीपणा, मनाचा मोठेपणा, समूहाच्या सोबत काम करण्याची वृत्ती इत्यादि अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे तुम्ही या पुरस्काराचे मानकरी ठरलात. आपण विनम्रपणे, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता नेमून दिलेले काम करणं शक्य आहे याचा वस्तुपाठ तुम्ही घालून दिला आहे.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपप्राचार्य मोरे सर, डॉ अपर्णा कोतापल्ले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक इत्यादींनी अभिनंदन केले आहे.