

विरांगणा व सौदामिनी संस्थेमार्फत शाळांमध्ये मोफत शैक्षणिक ॲप चे वाटप…
स्पर्धेचा युगात शैक्षणिक ॲपचा वापर खूप महत्वाचा आहे.:उमा सिंग
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी – गुणवत्ता वाढीकरिता वेगवेगळ्या संस्थांनी ई लर्निंग ॲप तयार करून मार्केटमध्ये आणले आहे विरांगणा व सौदामिनी या सेवाभावी संस्थांनी रोटरी क्लबच्या सहकार्याने सम्राट अशोक विद्यालय , चाणक्य विद्यालय सिद्धार्थ विद्यालय व इतर शाळांमध्ये जाऊन इयत्ता दहावीच्या 500 पेक्षा अधिक मुलांना मोफत ई लर्निंग ॲप चे वाटप केले आहे. गरीबाची मुले महागडे शैक्षणिक ॲप विकत घेऊ शकत नाही. इतर विद्यार्थ्यांबरोबर त्याही मुलांची गुणवत्ता वाढावी. म्हणून आम्ही रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत शैक्षणिक अँप देत आहोत असे वीरांगणाच्या सेक्रेटरी नीता बोरसे म्हणाल्या.विरांगणाचे अध्यक्ष उमा सिंग म्हणाल्या आम्ही गरिबी पाहिली आहे.आता स्पर्धेचे युग आहे.गरीबाचे मुले स्पर्धेत टिकावी म्हणून शैक्षणिक ॲप गरीब मुलांना मोफत देऊन त्यांना पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.कार्यक्रमाप्रसंगी इतर पदाधिकारी शुभांगी मगर, माधुरी शिंदे ,पूनम सिंग, अर्चना कदम ,सुलेखा गटकल ,लक्ष्मी आणि वंदना जाधव उपस्थित होते.