• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सुनील इंगळे यांचा मरणोत्तर देहदान संकल्प

Oct 13, 2023

Loading


सुनील इंगळे यांचा मरणोत्तर देहदान संकल्प
मुंबई येथील जीवनदाता सामाजिक संस्था गेली 26- 27 वर्षे नियमितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते त्यास दि सोशल सर्विस लीग मुंबई ,रोटरी क्लब ऑफ चेंबूर ,ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या सामाजिक संस्था सहकार्य करीत असतात नुकतेच या सर्वांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते परंतु एक नवी चळवळ ‘संकल्प मरणोत्तर देहदान’ या संदर्भात नोंदणी करण्यासाठी प्रथमच आवाहन व जनजागृती करण्यात आली त्यात मुंबईतील सुप्रसिद्ध के एम हॉस्पिटलच्या शरीररचना शास्त्र विभागाने सहकार्य केले. या चळवळीत जवळजवळ प्रथमच 34 व्यक्तींनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला त्यात श्री सुनील इंगळे यांनी एक सामाजिक बांधिलकी व अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून हा संकल्प केला यापूर्वी त्यांनी पत्नीसह नेत्रदान संकल्पही केला आहे त्यांच्या जीवनदाता सामाजिक संस्था मुंबई व रोटरी क्लब ऑफ चेंबूर यांच्यातर्फे प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व बॉडी डोनेशन कार्ड देऊन सत्कार करण्यात आला याबद्दल सुनील जी यांचा आमदार बालाजी किणीकर , आमदार विश्वनाथ भोईर ,नगरसेवक सुनील वायले,पत्रकार उत्कर्ष समितीचे योगेश चव्हाण , जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तीरपणकर आदी मान्यवरांनी कौतुक करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed