• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अमळनेर येथे साकळी उपोषण सुरू

Nov 1, 2023

Loading

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अमळनेर येथे साकळी उपोषण सुरू

अमळनेर दि.३१ ऑक्टोबर येथील मराठा समाजाचावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी सुरु आहे.मराठा समजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले वीस वर्षे महाराष्ट्रभर विविध आंदोलने सुरू आहेत.आरक्षणाचा प्रश्न हा लाखो समाज बांधवांच्या सन्मानाचा व जीविताचा प्रश्न असून मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात एक निर्णय आंदोलन अंतरवाली सराटी येथे सुरू केले आहे.या प्रश्नाबाबत आपल्या जीवाची बाजी लावून होत असलेल्या या व्यापक आंदोलनाबाबत शासनाची भूमिका ही संथ व दुर्लक्षित वेळ काढून पणाची राहिलेली आहे.वेळोवेळी मिळणाऱ्या खोट्या आश्वासनांना व मंत्र्यांच्या भुलथापांना मराठा समाज कंटाळातला असून हे आंदोलन आता एका निर्णायक वळणावर उभे आहे. आतापर्यंत ५६विशाल मोर्चे ५० च्या वर तरुणां च बलिदान या आंदोलनाने घेतले आहे. शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ऐतिहासिक वारसा व योगदान असणाऱ्या मराठा समाजाच्या न्याय मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जाती-जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न निषेधार्य आहे.याबाबतीत मराठा समाजाचा मनात प्रचंड चिड व तीव्र संताप असून ही भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी मराठा समाजबांधवांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर चालू असलेल्या मराठा आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे विविध पातळीवर टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येईल. तरी या बाबींची गंभीर्याने नोंद घेऊन शासन दरबारी मराठा समाजाची भावना मांडण्यासाठी या साखळी पोषणाची नोंद घेण्यात यावी असे मराठा समाजाच्या वतीने कळविण्यात आले आहे. उपोषणा ठिकाणी प्रवीण देशमुख,सचिन वाघ,घनश्याम पाटील, उज्वल मोर, दर्पण वाघ ,शुभम पवार,जयवंत पाटील ,अधिकराव पाटील, डॉ.अनिल शिंदे,एड. ललिता पाटील, कल्याण साहेबराव पाटील,राजश्री कल्याण पाटील, अरुण देशमुख, मनोहर पाटील,सचिन बाळू पाटील,जयवंतराव पाटील, जितेंद्र देशमुख,के.डी.पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र देशमुख, दीपक पाटील, सुनील शिंपी,संजय सूर्यवंशी, योगेंद्र देशमुख,शुभम देशमुख, अभिषेक देशमुख, उमेश वाल्हे, दीपक बडगुजर, जयेश पाटील, हर्षल जाधव, हितेश पाटील, प्रसाद पाटील, विजय पाटील, उमाकांत हिरे, उमेश साळुंखे,संतोष बोरसे, दिनेश महाजन, योगेश पाटील प्रकाश जोगी, जयवंत पाटील, उत्तम देशमुख, अशोक वरकडे हे उपोषणस्थळी होते.

कोट

सकल मराठा समाजाच्यावतीने अमळनेर येथे साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी सर्वांनी यावे यासाठी अमळनेरच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.राजश्री कल्याण पाटील यांनी सर्व अमळनेरातील भगिनींना मराठा समाजाच्यावतीने
आंदोलनास पाठिंबा द्यावा ही विनंती केली आहे. त्यानुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बारा बलुतेदार म्हणून आम्ही त्यांचेच मावळे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन उभे केले आहे.त्या सर्व आंदोलनात आम्हीही सर्व मावळे केंद्र व राज्य सरकारला सांगू इच्छितो, महाराजांच्या महाराष्ट्रात राहून तुम्ही इथे जातीपातीत द्वेष, भेदभाव पसरवताय; जातीवरून जे राजकारण करत आहेत. महाराजांनी त्यांच्या काळात सर्व जातिंना समान वागविले होते. बहुजन समाजाच्या सर्व महिलांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा द्यावा. मराठा समाज महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतो,सर्वांना न्याय मिळवून देतो. अशा मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *