• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पुष्पराज नारायण वाघ याने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत एअर पिस्टल या प्रकारात कांस्य पदक पटकाविले…..

Nov 1, 2023

Loading

दि 30/10/23 रोजी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक मार्फत आयोजित विभागीय शालेय रायफल शुटिंग स्पर्धा-२०२३-२४ या मध्ये आपल्या विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर ,जळगाव इ ९ वी स्वरस्वती मधील चि. पुष्पराज नारायण वाघ याने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत एअर पिस्टल या प्रकारात कांस्य पदक पटकाविले व त्याची निवड शालेय राज्यस्तरीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. या विजयी खेळाडूचे मा.मुख्याध्यापक श्री.हेमराज पाटील सर , विवेकानंद प्रतिष्ठान प्रशासन अधिकारी श्री.दिनेश ठाकरे सर, समन्वयिका सौ.वैशाली पाटील दिदी, सौ.जयश्री वनडोळे दिदी, क्रीडा शिक्षक श्री.संतोष वाळसे व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुष्पराज हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांचा चिरंजीव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *