• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग

Nov 1, 2023

Loading

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रक देऊन आंदोलनात सहभाग घेतला.
पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास पाठींबा पत्रक देत प्रत्यक्ष सहभाग घेण्यात आला.सदर पत्रकात नमूद केले आहे की जाती या व्यवसायावर आधारित निर्माण झाले आहेत शेती व्यवसाय करणाऱ्या एका कुणबी बांधवांस इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ मिळत असताना आ दुसऱ्या बांधवास केवळ मराठा नोंद असल्याने मूळ पिढी जात व्यवसाय शेतीचा असूनही त्यास आरक्षणापासून वंचित ठेवणे हे अयोग्य आहे. नैसर्गिक न्यायाला धरून शासनाने मराठा बांधवांनाही आरक्षणाचा लाभ देण्यास हरकत नाही. मराठा आरक्षणासाठी लढणारे उमेदवार नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा अमळनेरच्या आंदोलनास पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा जाहीर पाठिंबा आहे! असे पत्रकात नमूद असून यावेळी आंदोलकांच्यावतीने प्रविण देशमुख, सचिन वाघ, जयवंत पाटील, हर्षल जाधव यांना पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या पत्रक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले. मराठा आंदोलकांना पत्र देताना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, देविदास देसले, रविंद्र पाटील, रामराव पवार, डी.एम.पाटील, पुरुषोत्तम शेटे, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, महेंद्र जगताप, अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे,प्रविण संदांनशिव, प्रसाद चौधरी, सुशील भोईटे आदिंसह मनोहरनाना पाटील,जे.बी.पाटील,अनंत निकम,सचिन पाटील यांचेसह मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलन मंडपात समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलकांच्या सोबत यावेळी बसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *