• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन

Nov 1, 2023

Loading

मान्यवरांच्या सखोल मार्गदर्शनाने साजरा होणार मराठी लाईव्ह न्यूज चा 4था वर्धापनदिन

मराठी लाईव्ह न्यूज करणार कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा सन्मान!!

अमळनेर प्रतिनिधी
मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल म्हटलं की अमळनेर हे नाव! अगदी 4 वर्षाच्या दमदार वाटचालीने खान्देशात तसेच खान्देशाच्या बाहेर बातमी पोहोचविण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज ने केलेले आहे. सर्वच प्रकारच्या बातम्या लावुन पडद्यामागील काही लोक, संस्था यांना समाजाच्या पटलावर आणण्याचे अप्रतिम काम केलेले आहे..सत्य, वैचारिक, विवेकी, सात्विक, निर्मळ, संविधानाला, लोकशाहीला पोषक मूल्याची, समाजवाद, धर्मनिरपेक्षता अशा मूल्याची जाण ठेवून पत्रकारिता केलेली आहे..असंख्य अडगळीत पडलेल्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे कार्य केलेले आहे. पाडळसरे धरण, कृषी धोरण, शैक्षणिक उपक्रम, ज्वलंत समाजातील समस्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा, भ्रामक कथा यावर प्रबोधनात्मक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे..महिला गट तसेच त्यांच्या एनजीओ अंतर्गत कामे, राजकिय घडामोडी, निर्णय अशा सर्वच घटकांना प्राधान्य दिलेले आहे..त्याचा सुंदर परिपाक म्हणजे आज निर्माण झालेला असंख्य मित्रपरिवार, हितचिंतक, पाठीराखे याचा गोतावळा होय..
या धर्तीवर ह्या मानवतेची जाण, समाजभान, भारत भूमीची शान असलेले आपुलकीची माणसे यांच्या ऋणाची थोडी उतराई व्हावी हा शुध्द हेतू ठेवून दिनांक 12/11/2023 वार रविवार ला सकाळी 9-30 वाजता सानेगुरुजी ग्रंथालया समोर जुना टाउन हाँल येथे मराठी लाईव्ह न्यूज चा 4 था वर्धापनदिन साजरा करावा म्हणून नामवंतांच्या कर्तृत्वाचा सन्मान त्यांना पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे..
आमच्या हा मराठी लाईव्ह न्यूज च्या अथक परिश्रमात आपली साथ अनमोल मिळाली त्या जोरावर ही मजल गाठता आली..यापुढे ही आमचे मराठी लाईव्ह न्यूज चॅनेल अगदी अत्याधुनिक पध्दतीने आपणास जगातील,भारतातील, तसेच आपल्या महाराष्ट्रातील अदयावत घडामोडीची माहिती देत राहू..आजपर्यंत मराठी लाईव्ह न्यूज ने लोकांच्या मनावर, हृदयात स्थान अबाधित ठेवले आहे..अनेक साहित्यिक मंडळी मराठी लाईव्ह न्यूज वर प्रेम करतात त्यांच्या लेखणीला वहिवाट करून देण्याचे काम आमच्या चॅनेल ने केलेले आहे. आमचे चॅनेल हे आपले सर्वांचे चॅनेल आहे. आपल्या नवनवीन सूचना, बदल याला आम्ही शिरोधार्य मानले आहे..प्रखर मांडणीसाठी, सत्यासाठी कुणाचीही पर्वा केली नाही..
आपल्या ह्या अप्रतिम कार्यक्रमासाठी उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वर्धापन दिन व सत्कार कर्तुत्वाचा हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा
जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर तर
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या क्षेत्रात कर्तबगार व्यक्ती आपला अमूल्य वेळ देणार आहे..त्यात मा. महादेव खेडकर उपविभागीय अधिकारी अमळनेर, मा. सुनिल नंदवाळकर उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. कपील पवार उपसंचालक नागपुर महानगर प्राधिकरण, मा. विजय शिंदे पोलीस निरिक्षकअमळनेर, मा. डॉ. जयदीप पाटीअध्यक्ष नोबल फाऊंडेशन जळगाव, डाॅ. एस. आर. चौधरी मा.प्राचार्य एस. आर. चौधरी, प्रताप काॅलेज अमळनेर, मा. विलासराव पाटील अध्यक्ष महात्मा जोतिराव फुले हायस्कूल देवगांव हे उपस्थित राहणार आहेत..

“कर्तृत्वाचा सन्मान “पुरस्कारासाठी निवड झालेले अभिजन!!

१)प्रा. जयदीप पाटील अध्यक्ष नोबेल फाउंडेशन जळगाव
क्षेत्र- वैज्ञानिक

२) आबासो एस.डी देशमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सौ अनिता सतीश देशमुख
क्षेत्र-आदर्श माता पिता पुरस्कार

३) प्रा आर बी पवार व ज्योती राजेंद्र पवार

क्षेत्र-अध्यात्मिक

४) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर

क्षेत्र- उत्कृष्ट ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा केंद्र

५) स्वप्ना विक्रांत पाटील व विक्रांत पाटील

क्षेत्र-राजकीय

६) डॉ योगेश रघुनाथ महाजन

क्षेत्र- दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य

७) पक्षीमित्र अश्विन लीलाचंद पाटील

क्षेत्र-पर्यावरण

८) गणेश भामरे

क्षेत्र- युवा प्रेरणा पुरस्कार

९) अक्षय (मोन्टी) प्रताप साळी

क्षेत्र-युवा उदयोजक

१०) भिकेश पावभा पाटील
सामाजिक क्षेत्र

तरी सर्व पुरस्कार्थी बंधू भगिनी व मराठी लाईव्ह न्युज चे सर्व वाचक ,जाहिरातदार बंधू आणि भगिनी यांनी
सदर कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन ईश्वर महाजन, व सोपान भवरे यांनी आग्रहाने कळविले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *