• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर शहरातील सहा मुस्लिम जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Nov 3, 2023

Loading

अमळनेर शहरातील सहा मुस्लिम जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळा संपन्न

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमैन वेल्फेअर सस्थांच्या माध्यमातून दर वर्षी इस्लामी महिना ग्यारवी शरीफचे औचित्य साधून ऑल मुस्लिम समाजाचे सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात येते यंदा दिनांक २ नोव्हेंबर गुरवारी शहरातील बोरीनदी जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उत्तर प्रदेशातील बनारस येथील मौलाना खलिफा शाकिफ अहेमद असद यांच्या मुख्य उपस्थितीत सहा जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला
श्रीमंत असो की गरीब सर्वांनी सामुहिक विवाह समारंभातच आपल्या मुला मुलींचे लग्न करावे जेणेकरून खर्च वाचेल मौलाना खलिफा शाकिफ अहेमद असद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाचे हे चौथे सामुहिक विवाह होते सन २०१८ ते २०२३ पर्यन्त एकुण ३३ जोडप्यांच्या लग्न करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने सर्व संचालक मंडळाने मिळून एक लाख रुपये व शहरातील ठराविक मुस्लिम बांधवांनी देणगी म्हणून मदत केली आणि अतिशय उत्कृष्टपणे सहा जोडप्यांच्या सामुहिक विवाह पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मौलाना कारी हाजी नासीर बागवान यांनी कुराणातील तिलावत वाचन केली सैय्यद शौकत अली, हाफिज जुनैद ,मौलाना फयाज नक्शबंदी, अजहर नुरी,सगीर नुरी,नासीर हजरत, यांनी निकहा लावला तर सामाजिक कार्यकर्ते रफीक मिस्तरी व मा नगरसेवक फिरोज पठाण यांनी मित्र परिवार‌ आणि सैय्यद मुशर्रण अली यांच्या वतीने सर्व संचालक मंडळाचे सत्कार केले कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाचे अध्यक्ष हाजी शब्बीरअली सैयय, उपाध्यक्ष मोईनुद्दीन शेख ( मोना दादा ) जाकिर शेख शकुर, सचिव सैय्यद अजहर अली, खाजिनदार आरिफ मेमन, सहसचिव अशफाक शेख, सदस्य सैय्यद नबी, इम्रान अरब, मुत्तलीब खाटीक, ( मट्यासेठ) इमरान शेख, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अँड रज्जाक शेख यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *