• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नूतन ज्ञान मंदिर शाळेची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत विजयी हट्रिक नूतनज्ञांनमंदिर चा १७ वर्षाखालील मुलींची खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांकावर,श्रीराम युनिव्हर्सल हायस्कूल दुसऱ्या स्थानी.

Nov 4, 2023

Loading

नूतन ज्ञान मंदिर शाळेची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत विजयी हट्रिक नूतनज्ञांनमंदिर चा १७ वर्षाखालील मुलींची खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांकावर,श्रीराम युनिव्हर्सल हायस्कूल दुसऱ्या स्थानी.

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील मुलींची शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा आयोजित करण्यात आला होती. क्रीडा संनियंत्रक कृष्णा माळी, दिनेश पवार, मनिलाल शिंपी, यांचा उपस्थितीत क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, यांचा हस्ते १७ वर्षाखालील मुलींचा खो खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. देताना कांबळे विजयी संघाना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी विजेता आणि उपविजेता संघाला ५०० रुपयाचे रोख पारितोषिक देऊन कौतुक आणि अभिनंदन केले तसेच सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक व संघटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण स्पर्धेच्या पंच म्हणून नियोजनासाठी तेजस सपकाळ, भारत नाईकनवरे,विनायक मिसाळ,शुभम नाईकनवरे,मानव मोरे,शुभम ढगळे, आदित्य,रितेश मुंडे, यांनी अतिशय चांगले निर्णय देऊन खो खो खेळाडूंना योग्य निकाल देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट निरिक्षण केले. आहे.कल्याण डोंबिवली १७ वर्षांखालील मुलींची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा यशवंतराव चव्हाण मैदान (चिकनघर) कल्याण प. या ठिकाणी 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या खो खो स्पर्धेत छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व या शाळेने अंतिम सामन्यात घवघवीत यश मिळविले. सदर सामना श्रीराम युनिव्हर्सल हाई स्कूल डोंबिवली व नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व या दोन्ही संघात खेळला गेला.या सामन्यात नूतन ज्ञान मंदिर संघाने हा सामना 7 गुणांनी जिंकला.
नूतन ज्ञान मंदिर संघाची सलग तिसऱ्यांदा विभागीय स्तरासाठी निवड झाली.
1)श्रद्धा संजय धाडवे (कर्णधार )
2)मयुरी युवराज बांगर
3)प्रांजल भाऊसाहेब भाबड
4)हर्षदा अनिल विश्वासराव
5)सृष्टी गणेश वाकचौरे
6)मोहिनी शंकर शिंदे
7)सिद्धी भाऊसाहेब चकणे
8)कावेरी गुरुनाथ बहिरम
9)पायल विजय बहिरम
10)जुईली सुधीर कुंभार
11)अस्मिता भगवान सानप
12)निकिता गणपत राठोड
13)अनिशा अशोक जाधव
14)सिद्धी गणेश पावशे
15 ) श्रावणी सुधीर घोलप या सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.या विजयाचे श्रेय आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मीनाक्षी गागरे,यांनी सर्व क्रिडा शिक्षक व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले. पर्यवेक्षक .रमाकांत पाटील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक अभिषेक सर, महापदी सर यांचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
क्रीडा प्रमुख म्हणून गवळे सर व दळे सर यांनी काम पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *