• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रा. डॉ. दिपक चौधरी यांना साहित्यरत्न 2023 पुरस्कार

Nov 4, 2023

Loading

प्रा. डॉ. दिपक चौधरी यांना साहित्यरत्न 2023 पुरस्कार
मोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर)-धुळे येथील एस एस व्ही पी एस कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ,इंग्रजी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. दिपक चौधरी यांना नंदुरबार येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील साहित्य रत्न 2023 पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थे मार्फत हा पुरस्कार देण्यात आला प्रा. डॉ. दिपक चौधरी यांनी १७ वर्षाच्या सेवाकाळात 34 शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांचे इंग्रजी मधे दहा इंग्रजी कथा संग्रह, एक नोवेल, व एक संदर्भ ग्रंथ असे 12 पुस्तक प्रकाशित आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर संशोधन सादरीकरण करणाऱ्या प्रा. डॉ. दिपक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या दोन विद्यार्थी पीएच.डी .करत आहेत त्यांना समाजभूषण 2022, गुरु गौरव 2023, विद्या भूषण 2010, युवा मार्ग दर्शन 2012 इत्यादी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना डॉ. मधुकर पाडवी, कुलगुरु, बिरसा मुंडा विद्यापीठ,राज पिपला, गुजरात यांच्या हस्ते साहित्यरत्न 2023 हा पुरस्कार देण्यात आला. प्रसंगी इंग्रजी चे नामवंत लेखक डॉ. आर. पी सिंह ( उ. प्र.) हिंदीचे नामवंत लेखक डॉ. श्रीराम परी हार, ( म. प्र.) प्रा. डॉ. अहमद गुल, (अफगानीस्थान), मानव्य विद्याशाखे कबचौ, उ म वि, जळगाव चे अधिष्ठाता व निजामपूर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. पी.खैरनार , एस एस वी पी एस कला व वाणीज्य महाविद्यालय, धुलेचे प्राचार्य डॉ मनोहर पाटील , अक्कलकुवा कला, व वाणीज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी. पाटील , आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ जय बागुल, समन्वयक डॉ. गांगुर्डे व विविध महाविद्यालया तील तसेच परदेशी विद्यापीठा तील प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल एस एस व्ही पी एस संस्थेचे अध्यक्ष व आमदार कुणाल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र मंडळी तसेच आप्तेष्ट यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रा. डॉ. दिपक चौधरी हे मूळ मोहाडी प्र. डांगरी. येथील रहिवासी असून ते श्री किशोर शांताराम चौधरी यांचे बंधु आहेत.मोहाडी प्र डांगरी येथील सर्व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *