
तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिक्षकांच्या विविध समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध असणारे नगांव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार पाटील यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी कि महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जळगाव जिल्ह्य़ातून माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढीचे संचालक.नगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री तुषार नारायण पाटील यांना आज अमरावती विभागाचे शिक्षक आमदार मा किरण सरनाईक, पदवीधर आमदार मा धिरजभाऊ लिंगाडे यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार घेण्यासाठी तुषार पाटील यांच्याबरोबर मुख्याध्यापक बापू चव्हाण, साखरलाल महाजन, सुशील भदाने, संजय पाटील घोडगावकर उपस्थित होते.
तुषार पाटील यांचे अभिनंदन शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी केले..
चौकट
1 नोव्हेंबर 2005 पर्यंत नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनचा प्रश्न त्वरित सोडवा व त्यांना न्याय द्या अशी मागणी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार पाटील यांनी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार मा किरण सरनाईक, पदवीधर आमदार मा धिरजभाऊ लिंगाडे यांच्याकडे केली.
व शासन लवकरच जुनी पेन्शनचा प्रश्न मार्गी लावेल अशी त्यांनी आश्वासन दिले.