

शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी.
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, आंतरशालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील मुलांचा शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा आयोजित करण्यात आला होती. क्रीडा संनियंत्रक कृष्णा माळी, दिनेश पवार, मनिलाल शिंपी,शिवाई बालक मंदिर विद्यालय डोंबिवली चे क्रीडा संघटक श्री लजपत जाधव, राजा कोळंबकर, यांचा उपस्थितीत क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, यांचा हस्ते १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. देताना कांबळे विजयी संघाना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी विजेता आणि उपविजेता संघाला ५०० रुपयाचे रोख पारितोषिक देऊन कौतुक आणि अभिनंदन केले तसेच सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक व संघटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण स्पर्धेच्या पंच म्हणून नियोजनासाठी तेजस सपकाळ, भारत नाईकनवरे,विनायक मिसाळ,शुभम नाईकनवरे,मानव मोरे,शुभम ढगळे, आदित्य,रितेश मुंडे, यांनी अतिशय चांगले निर्णय देऊन खो खो खेळाडूंना योग्य निकाल देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट निरिक्षण केले. आहे.कल्याण डोंबिवली १७ वर्षांखालील मुलींची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा यशवंतराव चव्हाण मैदान (चिकनघर) कल्याण प. या ठिकाणी १७ वर्षांखालील मुलांचा आंतरशालेय जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा अंतिम शिवाई बालक मंदिर विद्यालय डोंबिवली ने सामन्यात घवघवीत यश मिळविले. सदर सामना शिवाई बालक मंदिर विद्यालय डोंबिवली व नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व या दोन्ही संघात खेळला गेला.या सामन्यात शिवाई बालक मंदिर विद्यालय डोंबिवली संघाने हा सामना रोमहर्षक पद्धतीने जिंकला. व प्रथम क्रमांकावर झेप घेतली.
नूतन ज्ञान मंदिर संघ उपविजेता ठरला.
या सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मीनाक्षी गागरे,यांनी सर्व क्रिडा शिक्षक व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले. पर्यवेक्षक .रमाकांत पाटील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक अभिषेक सर, महापदी सर यांचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
क्रीडा प्रमुख म्हणून गवळे सर व दळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शिवाई बालक मंदिर विद्यालय डोंबिवली चे क्रीडा शिक्षक, व विजयी खेळाडूंचे कल्याण डोंबिवली क्रीडा विभागाचे पर्यवेक्षक प्रविण कांबळे, सहनियंत्रक कृष्णा माळी, दिनेश पवार, तसेच कल्याण डोंबिवली विभागातील क्रीडा संघटक, क्रीडा असोसिएशन, यांच्याकडून विजयी संघांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.