• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कळमसरे येथे अज्ञात प्राण्याचा हल्ल्यात एक व्यक्ती जखमी

Nov 17, 2023

Loading

अज्ञात प्राण्याचा हल्ल्यात एक व्यक्ती जखमी
कळमसरे ता.अमळनेर(मोतीलाल महाजन)

दिनांक 17 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार
काल कळमसरे येथे एका व्यक्तीवर कोल्हा सदृश्य प्राण्याचा रात्री सुमारे 13 वाजता हल्ला झाला.
सविस्तर वृत्त,
कळमसरे येथे श्री ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन यांच्या शेतात विटांचा पडण्याचा कामासाठी सावदा येथील श्री बाळा पंडित कुंभार दरवर्षी व्यवसायानिमित्त येतात. दिवाळीत तर आपल्या कामासाठी कळमसरे येथे आलेले आहेत. घराची साफसफायीची कामे करत होती. तसेच व्यवसायासाठीचेही नियोजन सुरु होते. काल रात्री सुमारे 12 वाजेच्या आसपास त्यांच्यावर एका कोल्हासदृश्य प्राण्याने त्यांच्यावर व त्यांच्या मुलांवर हल्ला केला. अचानकझोपेच्या अवस्थेत झालेल्या हल्ल्यात ते खूप घाबरून गेलेत. अशा परिस्थितीत बाळा कुंभार याने आपल्या मुळाबाळांचे संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. प्राण्याचा हल्ला परतवून लावण्यात ते यशस्वी झालेत व प्राण्याने पळ काढला. अज्ञात हल्ल्यापासून त्यांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठेवले परंतु या हल्ल्यात ते जखमी झालेत
त्यांनी धुळे येथे उपचार करील असून पुढील उपचार हा मारवड आरोग्य केंद्र येथे करण्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे कलमसरे येथे कालपासून भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी शेतकरी व मजूर वर्गाने सावधानता बाळगावी या विषयी सूचना देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *