
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, नगरपरिषद मात्र चिडीचूप
दहा वर्षाच्या भाग्यश्रीला 25 ठिकाणी जावा घेतल्याने पडले पन्नास टाके..
अमळनेर शहरात गुरुकृपा कॉलनीतील घडली घटना..
शहरात विद्यार्थ्यांमध्ये भीती, नगरपालिकेने लक्ष घालण्याची वेळ
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरामध्ये सध्या मोकाट कुत्रे डुकरे, जनावरे यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नगरपालिका सुस्त आहे आणि जनता त्रस्त आहे याबाबत अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रार करूनही कर्मचारी झोपेचे सोंग घेत आहे. शहरातील कुत्रे, डुकरे, मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे..
सविस्तर माहिती अशी कि भाग्यश्री नितीन पवार (वय ६)ही बालिका शेजाऱ्यांना बोलवायला गेली असता अचानक बाहेरील पाच कुत्र्यांनी तिच्यावर
हल्ला चढवला. तिच्या
हातापायांना विविध ठिकाणी चावा
घेतला. आजूबाजूच्या नागरिकांनी
तिला कुत्र्याच्या तावडीतून
सोडवले. तिला तातडीने नर्मदा
फाउंडेशनमध्ये उपचारासाठी तात्काळ
दाखल करण्यात आले आहे. डॉ
अनिल शिंदे व डॉ संदीप जोशी
यांनी तिच्यावर तात्काळ उपचार केले.
कुत्र्यांनी तिच्या अंगावर 20 ते 25
ठिकाणी चावा घेतला आहे. तिला
50 टाके पडले आहेत. दरम्यान
ह्या भागातील बालकाला चावा घेण्याची दुसरी घटना आहे…
नगरपालिकेने भटके कुत्रे, जनावरे, डुकरे यांना वेळीच आवर घातला नाही तर येणाऱ्या काळात शहरातील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत हे तेवढे सत्य..
चौकट
मोकाट कुत्र्यांचा रीतसर बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे.
याबाबत आम्ही स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे.
परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
आता गावात/शहरात त्यांनीच राहावे किंवा माणसांनी राहावे हे निश्चित ठरवावे लागेल.लहान मुले जास्त करुन यांचे बळी पडतात आणि पडणार हे माहीत असूनही यास कोणीच दोषी नाही ?
निमूटपणे हे पाहत राहणे आम्हांस तरी शक्य होत नाही. विचारांच्या या शहरात हा अविचार कसा ?
बाकी काय बोलावे !!
विजय शिंदे
पोलीस निरीक्षक अमळनेर
चौकट
संबंधित विभागाची ही जबाबदारी असताना जर ते दुर्लक्ष करत असतिल तर त्यांच्या सारखे निगरगट्ट कोणी नाही असच म्हणाव लागेल, त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे..
ज्येष्ठ पत्रकार उमेश धनराळे
चौकट
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे.. एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला चावा घेतल्यानंतर ताबडतोब सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे
डॉ गिरीश गोसावी
वैद्यकीय अधिकारी अमळनेर