• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

व्यास क्रिएशन्स् आणि एडिसन क्लब आयोजित ‘प्रयोगाशिवाय प्रगती नाही’
या विज्ञानविषयक शालेय स्पर्धेमध्ये सहभाग

Nov 20, 2023

Loading

व्यास क्रिएशन्स् आणि एडिसन क्लब आयोजित ‘प्रयोगाशिवाय प्रगती नाही’
या विज्ञानविषयक शालेय स्पर्धेमध्ये सहभाग
व्यास क्रिएशन्स् ही प्रकाशन संस्था गेली 18 वर्षे बालसाहित्यामध्ये नवनवीन उपक्रम करीत आहे. ज्ञान आनंद महोत्सव, वाचू आनंदे महोत्सव, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, वाचन प्रेरणा दिन अशा अनोख्या उपक्रमातून मुलांना प्रेरीत करणे हे ‘व्यास’चे वैशिष्ट्य. शिक्षणाला पूरक असा खजिना बालवाचनालय हा उपक्रम महाराष्ट्रात शैक्षणिक अभ्यासक्रमाला पूरक उपक्रमातील एक मानबिंदू ठरला. मनोरंजक माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांचे भावनाविश्व समृद्ध करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे, असे आम्ही मानतो.
भारत देश आज स्वातंत्र्याच्या शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना, देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनी विज्ञानवादाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठीच एडिसन क्लब व
व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पहली उडान’ या ऑनलाईन उपक्रमांतर्गत नुकताच गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (‘विमानशास्त्र’ या विषयात) 3 सप्टेंबर 2023 रोजी प्रस्थापित केला. एडिसन क्लब ही संस्था गेली 12 वर्षे रोबोटिक सायन्स, वैज्ञानिक खेळणी आणि नवनवीन विज्ञानवादी संकल्पना राबवित मुलांमधून वैज्ञानिक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजवर हजारो विद्यार्थी या माध्यमातून विज्ञान क्षेत्रात पारंगत झाले आहेत.
निसर्ग, पर्यावरण, संगणक, शेती, खेळ आणि विविध शास्त्रीय विषयात आधुनिक भूमिका घेत आपला भारत देश प्रगतीपथावर आरूढ होत आहे. विविध क्षेत्रातील आपल्या देशाचे आधुनिक विज्ञानवादी धोरण यशस्वी ठरत आहे. ही आपणास अभिमानाची गोष्ट आहे. चंद्रयान-3 चे यशस्वी उड्डाण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक भारतीयाने आपली संस्कृती जपत विज्ञानवादी भूमिका स्वीकारून कार्यरत व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आजचा विद्यार्थी हाच आपल्या देशाचा पुढील विकासक असेल. म्हणूनच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून व्यास क्रिएशन्स् आणि एडिसन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ‘प्रयोगाशिवाय प्रगती नाही’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. ही स्पर्धा इयत्ता 3 री व 4 थी, 5, 6, 7 वी आणि 8, 9, 10 वी अशा तीन गटात होणार आहे. या उपक्रमांतर्गत लेखनस्पर्धा आणि प्रयोगलेखन स्पर्धा अशा दोन स्पर्धा वरील तीनही गटांसाठी असणार आहे.
निबंध लेखन स्पर्धा – विषय
गट 1 ः इयत्ता 3 री व 4 थी – शब्दमर्यादा 100 ते 150 शब्द
विषय – अ – माझा आवडता सण/ऋतू
ब – आमची सहल
क – समुद्राचे पाणी खारट का?
गट 2 ः इयत्ता 5, 6, 7 वी – शब्दमर्यादा 150 ते 200 शब्द
विषय – अ – इंद्रधनुष्य कशामुळे दिसते
ब – माझा आवडता शास्त्रज्ञ
क – स्वैपाकघरातील विज्ञान
गट 3 ः इयत्ता 8, 9, 10 वी – शब्दमर्यादा 200 ते 250 शब्द
विषय – अ – भरती, ओहटी आणि चंद्राचे अस्तित्व
ब – जल/वन संरक्षणll
क – ब्रह्मांडातील मानवाचे स्थान
प्रयोग लेखन स्पर्धा
गट 1 ः इयत्ता 3 री व 4 थी – मी वाचलेला, पाहिलेला, ऐकलेला, केलेला कोणताही एक प्रयोग लिहिणे..
उदा. मी लावलेले झाड…, दुर्बिणीने कागद जाळणे…, चहा बनविणे… किंवा दादा-ताईने केलेला एखादा प्रयोग… कोणत्याही विषयातील प्रयोग ग्राह्य धरला जाईल.
गट 2 ः इयत्ता 5, 6, 7 वी – मी वाचलेला, पाहिलेला, ऐकलेला, केलेला कोणताही एक प्रयोग लिहिणे..
उदा. वृक्षारोपण, स्वयंपाक घरातील प्रयोग, किंवा दादा-ताईने केलेला एखादा प्रयोग… कोणत्याही विषयातील प्रयोग ग्राह्य धरला जाईल.
गट 3 ः इयत्ता 8, 9, 10 वी – मी वाचलेला, पाहिलेला, ऐकलेला, केलेला कोणताही एक प्रयोग लिहिणे..
उदा. आपल्या शाळेत तुम्ही स्वत: केलेला किंवा पाहिलेला, शिकलेला, वाचलेला कोणताही एक प्रयोग लिहिणे.
• स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे…
ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात असेल.
ध्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाला ‘एडिसन क्लब’ अ‍ॅप डाऊनलोड करून स्पर्धेचा नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
एडिसन क्लब’ अ‍ॅपमधील ऑप्शनमध्ये आपण लिहिलेला निबंध किंवा प्रयोग स्पर्धकाने पाठवायचा आहे.
ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपाची असली तरी गुणात्मकदृष्ट्या महत्वाची आहे.
ही स्पर्धा समजून सांगण्यासाठी आपण आमच्या प्रतिनिधीला आपल्या शाळेतील संबंधित वर्गात जाऊन स्पर्धेचे विषय समजून सांगण्यासाठी परवानगी द्यावी, ही विनंती. वर्गावर्गात आमचा प्रतिनिधी स्पर्धा समजावून सांगेल आणि मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी रॅपिड फायर स्वरुपात जनरल नॉलेजचे दोन ते तीन प्रश्न विचारेल. विजेत्याला एक विज्ञानविषयक पुस्तक प्रोत्साहन म्हणून भेट दिले जाईल. अशा पुस्तकांचा एक संच शाळेलाही भेट देण्यात येईल.
ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केलेली आहे. जिल्हानिहाय प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ‘इस्त्रो’ला शैक्षणिक भेट, द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील वैज्ञानिक स्मारकाला भेट आणि तृतिय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटर येथे शैक्षणिक भेट, विविध उत्पादन करणार्‍या कारखान्यांना भेटी तसेच विमानतळे आणि औद्योगिक कारखान्यांना भेटी अशा स्वरुपाची बक्षिसे असणार आहेत. या सर्व शैक्षणिक भेटी संपूर्णपणे विनामूल्य असतील.
या व्यतिरिक्त प्रत्येक शाळेतील निबंध व प्रयोग लेखन या दोन गटांना खालील रुपये किमतीची व्यास क्रिएशन्स् प्रकाशित पुस्तके व सोबत सन्मानचिन्ह बक्षीस स्वरुपात असणार आहेत्
इयता 3 री व 4 थी
प्रथम क्रमांक ः रु. 5,000/-
द्वितीय क्रमांक ः रु. 3,000/-
तृतिय क्रमांक ः रु. 2,000/-
11 उत्तेजनार्थ ः रु. 1,000/-
11 विशेष उल्लेखनिय पारितोषिक रु.500/-्रु इयता 5, 6 आणि 7 वी
प्रथम क्रमांक ः रु. 7,500/-
द्वितीय क्रमांक ः रु. 5,000/-
तृतिय क्रमांक ः रु. 3,000/-
11 उत्तेजनार्थ ः रु. 2,200/-
11 विशेष उल्लेखनिय पारितोषिक ः
रु. 1,100/-
्रु इयता 8, 9 आणि 10 वी
प्रथम क्रमांक ः रु. 10,000/-
द्वितीय क्रमांक ः रु. 7,500/-
तृतिय क्रमांक ः रु. 5,000/-
11 उत्तेजनार्थ ः रु. 2,200/-
11 विशेष उल्लेखनिय पारितोषिक ः रु. 1,100/-
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला ए सर्टिफिकेट देण्यात येईल.
• आजी-माजी शिक्षक आणि ग्रंथपाल यांच्यासाठी विशेष निबंध स्पर्धा
विषय ः 1) स्वच्छता हेच जीवन
2) वाचनातून समृद्धी
3) आपल्या दृष्टीतून सृष्टीचे महत्त्व
विजेत्या शिक्षकांना सन्मानचिन्ह व बक्षीस स्वरुपात विजेत्या विद्यार्थ्याबरोबर शैक्षणिक सहलीचा आनंद घेता येईल.
आपल्या शाळेतील संबंधित सर्व मुलांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपण प्रोत्साहन दिल्यास 200+ अधिक आणि 500+ अधिक नोंदणी करणार्‍या शाळेला अनुक्रमे पारितोषिक म्हणून रु. 2,100/- व रु. 5,500/- किमतीची व्यास क्रिएशन्स् प्रकाशित पुस्तके देण्यात येतील.
‘प्रयोगाशिवाय प्रगती नाही’ या उपक्रमाला आपण सहकार्य करावे,
समन्वयक – राजेश देसाई 91675 27713 * नियम व अटी लागू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed