• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती

Nov 22, 2023

Loading

एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती

उरुळी कांचन पुणे: श्री सत्य इंदिरा फाउंडेशन , एस एस आय एफ या राष्ट्रीय पातळीवरील समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या एस इस सारस्वत यांनी नियुक्ती केली आहे.शिक्षा, स्वास्थ, महिला व बालकल्याण ,महिला सबलीकरण, पर्यावरण कार्य ,बेरोजगार ,पीडित निराधार अपंग सेवा, तसेच अन्नदान त्याचप्रमाणे बचपन बचाव, बेटी बचाव आंदोलन इत्यादी क्षेत्रात महत्त्वपूर्ण समर्पित भावनेने एस एस आय एफ संस्था राष्ट्रीय पातळीवर कार्य करीत आहे. संस्थेचे देशात व परदेशामध्ये सुद्धा अनेक नामांकित सभासद आहेत. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे मराठवाडा भूकंप , गुजरात भूकंप, गॅस्ट्रो साथ, कोरोना महामारी कार्य, दुष्काळग्रस्त भागात वैद्यकीय सेवा इत्यादी नैसर्गिक आपत्ती क्षेत्रात कार्य केलेले आहे. अपंग मूकबधिर मतिमंद निराधार सेवा कार्य ,शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय, अपंग मूकबधिरसेवा ,पत्रकारिता पर्यावरण , इत्यादी क्षेत्रात अनेक संस्थांमध्ये समर्पित भावनेने कार्य करीत आहे. स्वर्गीय पद्मश्री डॉ .मनीभाई देसाई यांनी डॉ. रवींद्र भोळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बायफचे खास प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेले आहे. डॉ. रवींद्र भोळे यांच्या विविध समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल घेऊन पारधी समाजातील आदिवासी लेखक समाजसेवक भास्कर भोसले यांनी डॉ. रवींद्र भोळे यांच्या ‘जीवनावर वाळवंटातील समाजसेवी सरोवर ‘हे पुस्तकही लिहिलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन स्वर्गीय लोकशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुणे येथे झाले होते. या सर्व कार्याची दखल घेऊन श्री सत्य इंदिरा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष एस स्मृति सारस्वत यांनी डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी डॉ. रवींद्र भोळे यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *