संविधान दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन
मुंबई प्रतिनिधी-घाटकोपर येथील कै. तुळशिराम सावते विद्यालयात संविधान दिनाचेाऔचित्य साधत अनु. जाती / जमाती आणिबौध्द आर्युविमा कर्मचारी कल्याणकारी संघटना मुंबई विभाग-२ च्या वतीने इ. ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. प्रमुख पाहुण्यांच्या वतीने संविधान उद्देशिका पत्राचे वाटप करुन संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचनही करण्यात आले. प्रसंगी आर्युविमा संघटनेचे विविध पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- ज्ञानदेव हांडे(राज्य कार्याध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.