• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुलुंड विद्या मंदिरात शहीद पोलिसांना अभिवादन

Nov 27, 2023

Loading

मुलुंड विद्या मंदिरात शहीद पोलिसांना अभिवादन

मुंबई | प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ, मुलुंड व बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलुंड विद्या मंदिर युवा विभागाच्या वतीने सामाजिक जागृती अभियान 2023 अंतर्गत थँक्यू मुंबई पोलीस कार्यक्रम शालेय सभागृहात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात 26/ 11 च्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून कर्तव्यदक्ष पोलिसांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शहिदांना विनम्र अभिवादन करून पोलीस अभिमान गीत व नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.मी मुंबई पोलीस बोलतोय या शीर्षकाखाली शुभ संदेश व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 26/ 11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमाला मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्याचे पी.आय. श्री गावडे साहेब व सर्व पोलीस अधिकारी हे संपूर्ण पोलीस टीम सह उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शशांक म्हात्रे साहेब यांनी भूषविले कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन व सूत्रसंचालन श्री संदीप माने सर यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक व शिक्षक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*
दमदार पावसात शाळेची सुरुवात! नवे शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू.
वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *