

सुरत प्रतिनिधी(विलास माळी)
आज श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३३ वी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करण्यात आले…!
दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ वार- मंगळवार- उधना,सुरत-
थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, शिक्षण महर्षी, ज्ञानाचा दाता,स्त्री मुक्तीचे प्रणेते, सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवणारे, महान क्रांतिकारक, थोर विचारवंत, मराठी लेखक, समाजातील अज्ञान,दारिद्र्य,जाती-भेद, बालविवाह सती-प्रथा यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुला- मुलींचे शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मुलींची पहिली शाळा काढणारे पहिले भारतीय समाज सुधारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंती चे जनक, स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी,कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धारकर्ते, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरूवर्य सत्यशोधक समाजाचे संस्थापक, द्रष्टामहापुरुष राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे,
“विद्येविना मती गेली!
मतिविना नीती गेली!
नीतिविना गती गेली!
गतिविना वित्त गेले!
वित्ताविना शूद्र खचले!
इतके अनर्थ एका अविद्येने केले!!
अशा या विचारातून समाजाला शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या व शिक्षणाचा तळापर्यंत प्रचार आणि प्रसार करणारे भारतीय सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३३ वी पुण्यतिथी निमित्त सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण उपस्थित सर्व समाज बांधवांच्या हस्ते करून कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करण्यात आले…! सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित उधना, सुरत,(गुजरात) येथील श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश गंभीर महाजन उपाध्यक्ष.श्री.भिकन दगा महाजन सेक्रेटरी प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर खजिनदार श्री. अशोक तानाजी महाजन सदस्य श्री.पुंडलिक मोतीलाल महाजन सदस्य श्री.आत्माराम पौलाद महाजन सदस्य श्री.विजय तुकाराम महाजन समाज बांधव श्री.नरेंद्र पुंडलिक महाजन,सर,ओम साई ग्राफिक्स सुरत चे संचालक श्री.विनोद सोमा महाजन,श्री.सोनू काशिनाथ महाजन,श्री.सुदाम खंडू महाजन श्री.पांडुरंग हिरामण महाजन तसेच बाळ गोपाळ उपस्थित होते. याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय व सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याविषयी माहिती उधना,सुरत,(गुजरात) येथील श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे सेक्रेटरी व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघाचे सुरत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.