• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे

Dec 2, 2023

Loading

शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे

विजय शिंदे पोलिस निरीक्षक यांचे आवाहन

अमळनेरला जरांगे पाटील यांची रविवारी होणाऱ्या सभेसाठी पत्रकार परिषद संपन्न

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला रविवारी चार वाजता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा साने गुरुजी विद्यालयात होणार असल्याने आज नुकतीच मराठा मंगल कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली.
पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव आबा पाटील होते.. प्रस्ताविक मराठा समाजाचे सचीव विक्रांत पाटील यांनी केले.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले की अमळनेरला रविवारी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेमध्ये मराठा समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी सहकार्य करून शांततेत सभा कशी पार पडेल यासाठी सहकार्य करावे.. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची तेवढीच काळजी घ्यावी असे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले..
पुढे पोलिस निरीक्षक शिंदे म्हणाले की
अमळनेरला चारही बाजूला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
आयोजकांचे सहकार्य अपेक्षित आहे. व सभेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी एक डी वाय एस पी, चौदा पोलीस निरीक्षक व १२५ कर्मचारी वर्ग तैनात केला आहे..पार्किंग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.. स्वामी समर्थ मंदिर च्या मागे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे चोपड्याकडील येणाऱ्या सर्व वाहनांसाठी व ग्लोबल हायस्कूल या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे,बाजार समितीच्या आवारात,सरजू शेठ च्या आजूबाजूला परीसरात, आण्णाभाऊ साठे पुतळयाच्या मागे व्यवस्था करण्यात आली आहे. यदा. कदाचित जास्त गर्दी झाली तर खड्डाजीन सुद्धा पार्किंगसाठी उपलब्ध आहे. पत्रकार भवन कार्यालयातही काही व्हीआयपी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. विश्रामगृहात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहनांची पार्किंगची व्यवस्था आहे,वाहनांची वर्दळ होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव आबा पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र देशमुख ,सचिव विक्रांत पाटील ,संचालक संजय पुनाजी पाटील, बाबू साळुंखे ,हर्षल पाटील, गुड्डू देशमुख, मनोहर नाना पाटील उपस्थित होते.
कार्यकर्त्यांसाठी व सभेला येणाऱ्या लोकांसाठी ठीक ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे . स्वच्छता कशी राहिल यासाठी सभेला येणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी रस्त्यांवर उघड्यांवर कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे असेही कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत आबा पाटील व सचिव विक्रांत पाटील यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांच्या सभेचे अगोदर पोवाडयांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.. विविध पोवाडे सादर केले जाणार आहेत.त्यासाठी तेरा लोकांची टिम आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण करून पदाधिकारी औपचारिक स्वागत करतील व लगेच सभेला सुरुवात होणार आहे असे सांगितले.
डॉ शरद पाटील म्हणाले की
धुळे कडून येणारे वाहन पारोळा मार्ग जातील व चोपडा मार्ग जाणारे धुळयाला पारोळा मार्ग जातील असे सांगितले व उद्याच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाची कशी तयारी असेल या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले.
या सभेसाठी
५हजार ते ७ हजार नागरिक सभेसाठी येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ५०० स्वयमसेवक,माजी सैनिक व पार्किंग वाहने लावण्यासाठी सहकार्य करणार आहेत असे आयोजकांनी सांगितले.स्वच्छता एक कर्तव्य म्हणून नागरीकांनी प्रत्येकाची जबाबदारी म्हणून स्वच्छता ठेवावी .एखादा सभेत आलेला व्यक्ती आजारी पडला व तब्येत बिघडली तर शासकीय दवाखान्यातील कर्मचारी ठेवण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला मराठा समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मराठा समाजाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले तर आभार सचीव विक्रांत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed