• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर तालुक्याचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले उत्तम प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानीत

Dec 5, 2023

Loading

अमळनेर तालुक्याचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले उत्तम प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानीत

अमळनेर प्रतिनिधी
दहीवद गावाचे सुपुत्र अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आण्णासाहेब श्री वासुदेव देसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरगाव याना सरपंच परिषद मुंबई यांचेमार्फत देण्यात येणाऱ्या “उत्तम प्रशासक “हा पुरस्कार पद्मश्री श्री पोपटराव पवार साहेब मार्गदर्शक पाणलोट कार्य महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली सर्वात तरुण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठाणे यांचे शुभ हस्ते आमदार श्री.अभिमन्यू पवार औंसा,आमदार श्री सुनील शेळके ,मावळ,आमदार श्री कृष्णा गजबे आरमोरी,श्री नवनाथ ढवळे पोलिस उपायुक्त भिवंडी ,श्री दत्ताभाऊ काकडे प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद यांचे प्रमुख उपस्थितीत यशदा सभागृह पुणे येथे श्री देसले साहेब याना प्रदान करण्यात आला आहे,, श्री देसले यांनी प्रशासकीय कार्य अहोरात्र करीत असताना समाजभिमुख पोलिस म्हणून अत्यंत महत्त्वाची जातीय सलोखा तसेच आदिवासी व्यक्तीन पूरग्रस्त स्थितीत मोलाचे मदतीचे साहस पूर्ण कार्य केलेले आहे याची दखल घेवून त्याना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्या अभिनंदन नामदार अनिल भाईदास पाटील जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ व मित्रपरिवार, दहिवद गावाचे सर्व ग्रामस्थ मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *