
सपनाताई माळी शिवणकर यांचा मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले समाजभूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा फुले मंडळ यांच्या सौजन्याने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीबाई फुले महिला पुरस्कार सोहळा 2024 मंगळवार दि. 9 जानेवारी 2024 रोजी महात्मा फुले मंडळ यांच्या सौजन्याने प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर अपर्णाताई डोके, आमदार उमाताई खापरे, मा.नगरसेवक वसंतनाना लोंढे, मा.नगरसेवक सुरेश जाधव, उद्योजक संजय जगताप, आण्णा गायकवाड, आनंदा कुदळे, चेतन भुजबळ, राजेंद्र करपे, मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, अनिल साळुंखे, सुर्यकांत ताम्हाणे, नरहरी शेवते, मंडळाचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सपनाताई माळी शिवणकर या गेली 12 वर्षे सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहेत. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध प्रशासकीय कार्यालयात निवेदन देऊन शेवटपर्यंत पाठपुरावा करुन न्याय देणे, महिलांचे व विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवणे, त्यासाठी मोर्चे, आंदोलने, रास्तारोको, थाळी बजाव, हलगी बजाव अशा विविध प्रकारची रस्त्यावरची लढाई त्या लढत जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत गेली कित्येक वर्षे जनसामान्यांना आधार देत आहेत. जनसामान्यांना न्याय देऊन समाजामध्ये त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या आधी देखील देशातील विविध सामाजिक संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. या अनेक पुरस्काराच्या मानकरी ठरलेले आहेत. सपनाताई यांना मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले समाजभूषण 2024 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सपनाताई माळी शिवणकर यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.