• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत राष्ट्रीय एकात्मता दर्शविन्यासाठी झारखंड राज्यातील खाद्य संस्कृती व पेहराव दर्शन

Jan 15, 2024

Loading

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत राष्ट्रीय एकात्मता दर्शविन्यासाठी झारखंड राज्यातील खाद्य संस्कृती व पेहराव दर्शन

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रम शाळा पिंपळे येथे
12 जानेवारी, वार शुक्रवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे ॵचित्य साधून माननीय मुख्यमंत्री‌ श्री एकनाथजी शिंदे यांच्या माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत *राष्ट्रीय एकात्मता उपक्रमांतर्गत *झारखंड राज्य पेहराव व खाद्य संस्कृती मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्याचे उद्घाटन अमळनेर येथील खान्देश मंडळाच्या सहसचिव, निवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती वसुंधरा ताई लांडगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उपक्रमात विद्यार्थिनींनी शिक्षिकांच्या सहाय्याने झारखंड राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ उदा. दुधौरी,डुम्बू,धुस्का, छिलकारोटी ,लिठ्ठी-चोखा,पिठा,
मदुआ रोटी,चरपा इ.विविध खाद्यपदार्थ बनविले व त्यांची आकर्षक मांडणी केली. तसेच विद्यार्थिनींनी झारखंड राज्याचा पेहराव करत तेथील संस्कृतीचे देखील दर्शन घडविले.खाद्यपदार्थ बनविण्याकरिता शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील,सीमा चौधरी व अधीक्षिका विद्या पाटील यांनी विद्यार्थिनींना सहकार्य केले. तसेच झारखंड राज्य पेहराव दर्शविण्यासाठी माधुरी पाटील यांनी प्रयत्न केला.सदर उपक्रम यशस्वी होण्याकरिता प्राथ व उच्च माध्य विभागातील शिक्षक हेमंत पाटील, स्वप्निल एच पाटील, प्रतीक पाटील,‌प्रविण पाटील (अधिक्षक),संजू पवार यांनी अनमोल असे सहकार्य व प्रयत्न केले. उपस्थित अतिथी मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थिनींच्या झारखंड राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा व राष्ट्रीय एकात्मता दर्शविण्याच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्षा सौ विद्याताई युवराज पाटील मॅडम व सचिव नानासाहेब श्री युवराज दगाजीराव पाटील साहेब यांनी देखील राष्ट्रीय एकात्मता उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *