
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत ‘विद्यार्थी व शिक्षक आरोग्य तपासणी शिबिर’ व ‘स्वच्छ हात धुवा’ उपक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रमशाळा पिंपळे येथे
12जानेवारी2024, वार शुक्रवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर तसेच स्वच्छ हात धुवा प्रात्यक्षिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्रमात जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉ.हर्षदा पालीवाल (समर्पित आश्रम शाळा पथक जळगाव) डॉ.सय्यद अझम व आरोग्य सेविका अश्विनी कवडे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच डॉ. हर्षदा पालीवाल यांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धती कोणत्या व हात धुण्यास उपयुक्त सोयीसुविधा कशा उपलब्ध कराव्यात याविषयी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्यांकडून देखील हात धुण्याच्या योग्य पद्धतींचा सराव करवून घेतला. संस्थेच्या अध्यक्षा ताईसो विद्याताई युवराज पाटील मॅडम व सचिव नानासाहेब श्री युवराज दगाजीराव पाटील साहेब यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना पुढील उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.