

टिळकनगर विद्यालयाचा आर एस पी युनिट तर्फे रस्ता सुरक्षा रॅली चे आयोजन,
विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम आपल्या घरातून समाजापर्यंत पोहवचून जागृती करावी-साळुंखे मॅडम
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) 34 वा रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त,कल्याण डोंबिवलीत सहायक उपायुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, रामनगर वाहतूक डोंबिवली शहर पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे साहेब यांचा नेतृत्वाखाली, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट नागपुर संघटन अंतर्गत डोंबिवली विभाग डोंबिवली येथील नामांकित टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली पूर्व मधील आर एस पी बाल सैनिकांचा समावेश करून ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त रामनगर पोलीस स्टेशन वाहतूक विभाग डोंबिवली पूर्व येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आर एस पी चां बाल सैनिकांनी रस्ता सुरक्षा बाबत घोषणा देत ,तसेच रिक्षा चालक यांना वाहतुकीचा नियमांचे पालन करून आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे रक्षण करणे आवश्यक आहे.अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. या रॅलीची सांगता टिळक नगर विद्यामंदिर येथे करण्यात आली. त्या ठिकाणी डोंबिवली शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक चव्हाण साहेब तसेच पोलीस हवालदार शशिकांत गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम संदर्भात मार्गदर्शन करताना वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांना विशेष माहिती दिली.
ठाणे ग्रामीण पालघर नाशिक विभागाचे कमांडर मनिलाल शिंपी यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा, आणि वाहतुकीचे नियम यांचे आपल्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे याबाबत मार्गदर्शन केले.
डोंबिवली विभागाचे समादेशक किरण वसईकर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आर एस पी अधिकारी
निवृत्ती खराटे ,सौ.प्रज्ञा बापट
जोगमार्गे सर,मुख्याध्यपिका चंद्रमोरे मॅडम,शाळेच्या उपमुख्याध्यापिका साळुंखे मॅडम, यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर रॅली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल आर एस पी अधिकारी शिक्षक निवृत्ती खराटे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली आर एस पी समादेशक अनंत किनगे, कल्याणडोंबिवली,अंबरनाथ,बदलापूर,भिवंडी विभागीय समादेशक महादेव क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.