
मी शिक्षकांचा पाठीशी कायम आहे,काळजी करू नका,मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ठोस आश्वासन.
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झटणारे, शिक्षकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून त्यांना अनेक संकटातून बाहेर काढणारे शिक्षकांचे आधारस्तंभ आणि कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांवर मागील महिन्यामध्ये शश्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना राज्यभरातून आपले शिक्षक बांधव जुनी पेन्शन, वाढीव टप्पा, अनूदान, मूल्यांकन पात्र शाळांना अनुदानमिळणे, जुन्या शाळांना स्वयं अर्थसहायित घोषित न करता त्यांना अनूदान देणे अश्या अनेक मागण्या घेऊन उपोषण, आंदोलन करीत आहेत, अश्या परिस्थिती मध्ये आपली तबीयत ठीक नसताना देखील, फोन वर बोलणे शक्य होत नसताना देखील, आमदार सरांमध्ये असलेला एक उत्तम शिक्षक त्यांना स्वास्थ बसून देत नाही आणि म्हणून त्यांनी आपणास फोनवर बोलण्याची बंदी असताना देखील त्यांनी आपला फोन घेत राज्याचे मुखमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे शिक्षण मंत्री मा. दिपकजी केसरकर साहेब यांच्या सोबत फोनद्वारे सकारात्मक चर्चा केली.*
*आजारपणामुळे आपणाला मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहचणे शक्य नसल्यामुळे आपले मोठे बंधू मा. वामनदादा म्हात्रे यांना मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यास सांगितली आणि मा. वामनदादा म्हात्रे यांनी भेट घेऊन शिक्षकांचे प्रश्न मांडले त्यावर मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले की, मी राज्यातील शिक्षक बांधवांच्या पाठीशी आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांच्या सोबत बोलून योग्य असा निर्णय लवकरच घेऊ शिक्षकांनी काळजी आणि चिंता करू नये मी त्यांच्या सोबत आहे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सांगा की तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असे सांगून विचारपूस देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.अशी माहिती
विष्णू विशे
संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्याकडून देण्यात आली आहे.