• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने आयोजन केलेला उपक्रम

Feb 6, 2024

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने आयोजन केलेला उपक्रम

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात गणित विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येथील कन्या शाळा, जी.एस. हायस्कूल व पी.बी. हायस्कूल या शाळांना एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट (आठवी, नववी व दहावी वर्ग) पाच फेब्रुवारी रोजी देण्यात आले. त्यातून त्यांचा प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल व शाळेतील वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना बोलवून त्या विद्यार्थ्यांना नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने गणित विभाग अमळनेर व प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या यांच्यावतीने डॉ. एस. आर. चौधरी गणित विभागाचे प्रमुख कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे गणिताचा प्रचार व रामानुजन चे कार्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *