जिल्हा परिषद दहीगाव शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, चमचा लिंबू, गोणपाट शर्यत, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या .
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक तयारी दिसून आली.स्पर्धा घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
