• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी

Feb 7, 2024

Loading

भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत आत्माराम शिरसाठ यांच्या भारतीय संविधानाचे अनंत उपकार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी समता शिक्षक परिषदेच्या वतीने जळगाव येथील प. न. लुंकड विद्यालयात दुपारी 12.30 वाजता गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संपन्न होणार आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे सदर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर असून डायट चे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड, मनपा उपायुक्त अभिजीत बाविस्कर, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईचे सेवानिवृत्त कुलसचिव प्राध्यापक शांताराम बडगुजर, जळगाव डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, अधिव्याख्याता डॉक्टर जगन्नाथ दरंदले, उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, साहित्यिक जयसिंग वाघ, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.
लेखक भरत शिरसाठ हे जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे कार्यरत असून त्यांचे हे सातवे पुस्तक आहे. सदर पुस्तकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य चे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे व बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांची प्रस्तावना आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन समता शिक्षक परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *