• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ देवाजी साळी मा.नगरसेवक अमळनेर40 वे पुण्यस्मरण निमित्ताने दोन शब्द….

Feb 14, 2024

Loading

जाहिरात….

स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ देवाजी साळी मा.नगरसेवक अमळनेर
40 वे पुण्यस्मरण निमित्ताने दोन शब्द….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ देवाजी साळी मा.नगरसेवक अमळनेर आज आपला ४० वे पुण्यस्मरण…..
अपार कष्ट सोसले, स्वसुख भोगायचे राहून गेले,
थोरा मोठ्यांना जीव लावला, सर्वांच्या कल्याणासाठी देह झिजविला,
आता उरली नाही साथ आम्हाला, वाट पाहतो तुमची, यावे पुन्हा जन्माला….
ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण आप्पासाहेब…
धर्य,अविरत मेहनत, सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता ,ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्व या परमेश्वराने बहाल केलेल्या अनमोल गुणांचे तेजोमय व्यक्तिमत्त्व म्हणजे कै आप्पासाहेब होय…
आप्पा,आपण आपल्या सामाजिक जीवनात व्यवसाय जीवनात तसेच नगरसेवक असताना गोरगरीब दिन दलित समाजातील तळागाळातील जनतेचे आपण समाजसेवा व त्याकाळी आरोग्य दूत म्हणून आपण जी इमानदारीने सेवा केली त्या सेवेची पुण्याईची शिदोरीने आजही आम्ही प्रगती पथाकडे वाटचाल करीत आहोत .
स्वर्गीय आप्पा व स्वर्गीय भागा आजींच्या पुण्याइने आपण लावलेला बगीचा भर भरून हिरवागार बहरत आहे.
आपल्या या पुण्यतिथी दिवशी आपणास नतमस्तक होऊन शतशा त्रिवार वंदन..
आप्पासाहेब आपण आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले तुम्ही माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही आज४० व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

शोकाकुल
प्रताप छबुलाल शेठ साळी मा.
नगरसेवक
दीपक छबुलाल शेठ साळी अर्बन बँक संचालक
संदीप छबुलाल शेठ साळी
एस टी महामंडळ
प्रसन्नजीत ( विकी)
अक्षय (मॉन्टी) हार्दिक ,श्लोक, मनस्वी सुभद्रा
व श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *