• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्र नव निर्माण सेना नेतेअमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.

Feb 20, 2024

Loading

महाराष्ट्र नव निर्माण सेना नेते
अमित ठाकरे यांची मंत्रालयात धाव.

(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मंत्रालयातून विशेष वृत्तांकन)

मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची व्यथा व्यक्त केली होती. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक आयुक्तांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली.

अमित ठाकरे यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, चेतन पेडणेकर या वेळी उपस्थीत होते. राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि . निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला होता . निवडणूक होणार याची कल्पना निवडणूक आयोगास नाही का? निवडणूकीसाठी पर्यायी कर्मचारी व्यवस्था निर्माण करावी. शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुपणे अयोग्य आहे. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मुंबईतील शिक्षकांनी निवडणूक कामावर रुजू होण्यास नकार द्यावा अशा सुचना राज ठाकरे यांनी शिक्षकांना दिल्या होत्या. या संदर्भात आजची निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली.
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या कामासाठी पर्यायी कर्मचारी व्यवस्था उभारण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडे केले आहे.याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी निवृत्त कर्मचारी, निवृत्त शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त करण्याची योजना सांगितली. दर पाच वर्षांनी निवडणूक होत असतात अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना या मुक्त करावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी असे ठाकरी भाषेत सांगितले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता याचा पुनरुच्चार अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. शिक्षकांना शिकवू द्या. अध्ययन व अध्यापन काम शाळेत सुरळीतपणे चालले पाहिजे ही आमची धारणा आहे असे प्रतिपादन अमित ठाकरे यांनी केले. आजच्या चर्चेनंतर लवकरच शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्तता मिळण्याबाबत पावले उचलली जातील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शाळेच्या शिक्षकांना नोटीस दिली आहे. त्या संदर्भात त्यांनी शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी व निवडणूक कामावर रुजू होऊ नये असे आदेश दिले आहेत अमित ठाकरे यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आता शिक्षक राज ठाकरे यांच्या आदेशानुसार काय करतात? या कडे पालकवर्गासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.राज ठाकरे व मुंबई भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीबद्दल राजकीय भाष्य मात्र अमित ठाकरे यांनी सफाईदारपणे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *