• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदी परिसंवादाचे आयोजन

Feb 20, 2024

Loading

प्रताप महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदी परिसंवादाचे आयोजन

प्रताप महावि‌द्यालय (स्वायत) अमळनेर येथे दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) च्या आर्थिक सहकार्याने संपन्न होत असलेल्या व दोन दिवस चालणाऱ्या ह्या परिसंवादात देश-विदेशातून अनेक हिंदी विद्वान, प्राध्यापक,संशोधक आदी सहभागी होत आहेत.
परदेशी लोकांच्या दृष्टीने हिंदी हीच भारताची मोठी भाषा व राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते. जगातील एकूण 100 देशांतील विद्यापीठामध्ये हिंदी भाषा शिकविली जाते. एकट्या अमेरिकेच्या 20 विद्यापीठामध्ये हिंदी शिक्षणाची केंद्रे अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत हिंदी भाषेचा जगात आजपर्यंत कसा व किती विकास झाला? कोणकोणत्या देशातील किती लोक हिंदी भाषेत बोलतात व लिहितात? भारताचा इतर देशांशी होत असलेल्या व्यापारमध्ये हिंदी भाषेचा कसा व किती उपयोग होत आहे? परदेशातील हिंदी शिक्षणाचे कसे व कोणते फायदे आहेत?परदेशातील संचार माध्यमात हिंदीचा कसा व किती प्रयोग होत आहे हे जाणून व समजून घेण्याच्या उद्‌देशाने सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.*

एकूण दोन दिवस व सहा सत्रात होत असलेल्या ह्या परिसंवादात जापानच्या ओसाका विद्यापीठातील सेवानिवृत प्राध्यापक पद्मश्री डॉ. तोमियो मिजोकामी, ओसाका वि‌द्यापीठाच्या हिंदी विभागातील प्रवक्ता डॉ. वेदप्रकाश सिंह, टोकियो वि‌द्यापीठातील डॉ. सुरज प्रकाश बडत्या, जर्मनीच्या लाइपत्सिग वि‌द्यापीठाच्या श्रीमती अडेले हेन्निश, उझबेकिस्तानच्या ‘नमस्ते हिंदुस्तान’ हया दूरदर्शन कार्यक्रमाचे मुख्य संपादक अखमादजान कासिमोव, नेपाळच्या त्रिभुवन वि‌द्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. संजीता वर्मा, श्रीलंकेच्या बेलोहोलीयेच्या सबारागुमावा वि‌द्यापीठातील हिंदी प्राध्यापक डॉ. बर्सेल नागाड वितान ह्या प्रमुख पाहुण्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होत असलेल्या ह्या परिसंवादाचे उद‌घाटन केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा व केंद्रीय हिंदी निदेशालयाचे निदेशक डॉ. सुनील बाबुराव कुलकर्णी यांच्या हस्ते होत आहे. सदर परिसंवादात देश-विदेशातील अनेक वि‌द्वान ऑनलाइन पद्धतिने सु‌द्धा संवाद साधणार आहेत. दिल्ली वि‌द्यापीठाचे सेवानिवृत प्राध्यापक व फीजी देशातील भारतीच दूतावासाचे माजी प्रथम सचिव डॉ. विमलेश कांति वर्मा, मॉरीशसच्या भारतीय दूतावासाच्या माजी द्वितीय सचिव डॉ. नूतन पांडेय, त्रिनिनाद, टोबैगो व वेस्ट इंडीज देशाच्या भारतीय दुतावासाचे माजी ‌द्वितीय सचिव डॉ. दीपक पांडेय, वैश्विक हिंदी शोध संस्थान देहरादूनचे महानिदेशक डॉ. जयंतीप्रसाद नौटीयाल, उतराखंड हिंदी अकादमीचे उपसचिव डॉ. सुशील उपाध्याय, जवाहरलाल नेहरू वि‌द्यापीठाच्या रूसी अध्ययन केंद्रातील सेवानिवृत प्राध्यापक डॉ. हेमचंद्र पांडे, राष्ट्र‌भाषा प्रचार समिती वर्धाचे प्रधानमंत्री डॉ हेमचंद्र वैद्य, महात्मा गांधी अंतर्राष्ट्रीय वि‌द्यापीठाच्या चीनी भाषा विभागातील प्राध्यापक डॉ. अनिर्बाण घोष, “हिंदी समय डॉट काम” चे संपादक डॉ. अमित विश्वास, गिरमिटीया संस्कृतिच्या विशेषज्ञ दिप्ती अग्रवाल, अमेरिकेच्या कोलंबिया वि‌द्यापीठाच्या डॉ. अंजना संधीर, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महाराष्ट्र सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर, जळगाव आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत कार्यक्रम अधिकारी सुधीर ओखदे, नूतन मराठा महाविद्यालयाच्या माजी हिंदी प्राध्यापिका डॉ. उर्मिला पाटील हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच चीनच्या क्वान्तोंग विदेशी भाषा विद्यापिठाचे डॉ. विवेक मणि त्रिपाठी, रशियाच्या मॉस्को वि‌द्यापीठातील डॉ.लिउडमिला खोखलौवा डॉ. अनिल जनविजय, बेल्जियमच्या डॉ. राजकुमारी गौतम, इंग्लंडच्या डॉ. तिथी दानी, अमेरिकेच्या ड्युक वि‌द्यापीठातील डॉ. कुसुम नेप्त्सीक व ह्यूस्टन विद्‌यापीठाच्या डॉ.इला प्रसाद मॉरीशसच्या डॉ. शशी डूकन व डॉ. अलका धनपत, न्यूझीलंडच्या सुनीता नारायण व डॉ.रोहितकुमार ‘हैप्पी’, सिंगापूरच्या डॉ. संध्या सिंह, पोर्तुगालचे डॉ. शिवकुमार सिंह, दक्षिण आफ्रिकेच्या सुनंदा वर्मा,कनाडाच्या डॉ.हंसा दीप,उज़्बेकिस्तानचे डॉ.सिराजोद्दीन नुर्मातोव व दिल्ली वि‌द्यापीठाचे सेवानिवृत प्राध्यापक डॉ. कर्ण सिंह चौहान हे ऑनलाइन पद्‌धतीने सहभाग घेतील.सदर परिसंवादात देश-विदेशातील अनेक वि‌द्वानांच्या शोधनिबंधाचे व अनुभवांचे प्रत्यक्ष व ऑनलाइन सादरीकरण होईल. उद्‌घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष खान्देश शिक्षण मंडळाचे माननीय कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे हे असतील तर समारोपाचे अध्यक्ष खा.शि. मंडळाचे कार्योपाध्यक्ष श्री. प्रदीप अग्रवाल असतील. सदर परिसंवादात वि‌द्यापीठ क्षेत्रातील व राज्यातील हिंदी प्राध्यापक,शिक्षक,संशोधक,वि‌द्यार्थी व हिंदी भाषा प्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहान खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महावि‌द्यालयाचे प्राचार्य प्रो. अरुण जैन, संयोजक प्रो. कुबेर कुमावत, सहसंयोजक प्रो. शशिकांत सोनवणे व प्रो. कल्पना पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed